गव्हाच्या विक्रमी उत्पादनासाठी पाण्यासोबतचं ‘हे’ तीन खत द्या ! विक्रमी उत्पादन मिळणार, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Wheat Farming : गहू हे राज्यासह संपूर्ण देशात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची राज्यातील प्रमुख बागायती भागांमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड होते. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये या पिकाची शेती पाहायला मिळते. रब्बी हंगामातील हे एक मुख्य पीक आहे.

यंदाच्या रब्बी हंगामातही या पिकाची राज्यासहित संपूर्ण देशात बऱ्यापैकी लागवड पाहायला मिळत आहे. मान्सूनकाळात कमी पाऊस झाला असल्याने महाराष्ट्रातील गहू लागवडीखालील क्षेत्र किंचित कमी झाले आहे

मात्र तरीही ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची शाश्वत उपलब्धता होती त्या शेतकऱ्यांनी गव्हाची लागवड केली आहे. दरम्यान गव्हाच्या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी गव्हाच्या पिकात पाण्यासोबतच काही महत्वाच्या खतांचा वापर शेतकऱ्यांनी केला आहे.

शेतकरी वेळोवेळी गव्हाच्या पिकाला सिंचन देतात. फक्त पाणी आणि योग्य खतांचा वेळेवर वापर केल्याने गव्हाच्या पिकात चांगले फुटवे निघतात, त्यांची चांगली उगवण होते आणि हिरवळ देखील टिकून राहते.

पण गव्हातील फुटव्यांची संख्या आणखी वाढवण्यासाठी आणि लोंब्याची संख्या वाढवण्यासाठी कोणत्या खताचा वापर केला पाहिजे, याविषयी जाणून घेणार आहोत. या खतांचा वापर करून शेतकरी त्यांच्या पिकाचे उत्पादन वाढवू शकणार आहेत.

गव्हाच्या पिकासाठी सागरिका, झिंक सल्फेट आणि मॅग्नेशियम सल्फेट तसेच ह्युमिक अॅसिड 98% याचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यात सागरिका हे खत 10 किलो प्रति एकरसाठी वापरले जाऊ शकते.

सागरिका या खतात लोह, मॉलिब्डेनम, तांबे, लोह आणि समुद्री शैवाल इत्यादी सूक्ष्म अन्नद्रव्ये आढळतात. जे पिकाच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक असतात.

तसेच झिंक सल्फेट आणि मॅग्नेशियम सल्फेट ही खते वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. झिंक सल्फेट आणि मॅग्नेशियम सल्फेट झाडाला हिरवेपणा आणण्याचे काम करतात आणि या खतात सल्फर देखील आढळते. त्यामुळे पिकातील सल्फरची कमतरता पाहायला मिळते.

याशिवाय ह्युमिक अॅसिड 98% 1 किलो प्रति एकर दराने वापरले जाऊ शकते किंवा 5 किलो प्रति एकर ट्रायकॅन्टोनल वापरले जाऊ शकते. ही दोन्ही खते तुम्हाला दाणेदार स्वरूपात घ्यावी लागतील. यामुळे पिकातील प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया वाढते आणि झाडाची वाढ जास्त होते.

वर नमूद केलेली ही तीन खते तुम्ही युरियामध्ये मिसळून वापरू शकता. युरिया द्यायचा नसेल तर वाळूत मिसळूनही वापरू शकता. हे खत वापरल्याने तुमच्या गव्हाच्या पिकाला नक्कीच जास्त लोंब्या येतील आणि जास्त दाणे तयार होण्यास मदत मिळेल.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा