गव्हाच्या ‘या’ वाणाची शेती शेतकऱ्यांसाठी ठरणार फायदेशीर ! 8 हजार रुपय प्रति क्विंटलचा मिळतो भाव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Wheat Farming : सध्या राज्यासह संपूर्ण देशात रब्बी हंगाम सुरू आहे. रब्बी हंगामातील जवळपास सर्वच पिकांची पेरणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. गव्हाची पेरणी देखील जवळपास पूर्ण झाली आहे. गव्हाची पेरणी ही साधारणतः नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होते.

मात्र ज्या शेतकऱ्यांना नोव्हेंबर मध्ये पेरणी पूर्ण करता येत नाही ते शेतकरी डिसेंबर महिन्यात याची पेरणी करतात. डिसेंबर मध्ये गव्हाची पसात लागवड होते. मात्र याची पेरणी जेवढी उशिराने होते तेवढी उत्पादनात घट येत असते.

यामुळे गव्हाची शक्यतो वेळेवरच पेरणी झाली पाहिजे. पण ज्या शेतकऱ्यांना काही कारणास्तव वेळेवर पेरणी करता येत नाही त्यांनी गव्हाच्या काही सुधारित जातींची निवड करून पसात लागवड केली तरी देखील त्यांना बऱ्यापैकी उत्पादन मिळू शकते.

दरम्यान आज आपण गव्हाच्या अशाच एका सुधारित जातीची माहिती जाणून घेणार आहोत ज्याची पेरणी पसात केली तरी देखील शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकणार आहे.

विशेष म्हणजे आज आपण ज्या गव्हाच्या वाणाची माहिती जाणून घेणार आहोत त्याला बाजारात तब्बल 8000 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळत आहे.

कोणता आहे तो वाण

या वाणाला सोना-मोती या नावाने ओळखले जाते. या जातीचा गहू हा मानवी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. यामध्ये असणारे पौष्टिक गुणधर्म मानवी आरोग्य सुधारण्यासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका निभावत आहेत.

गव्हाच्या इतर जातींच्या तुलनेत या जातीमध्ये जवळपास तिप्पट फॉलिक अॅसिड आढळून येते. फॉलिक अॅसिड गर्भवती महिलांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. याशिवाय केस मजबूत करण्यासाठीही हे उपयुक्त आहे.

तसेच या गव्हामध्ये प्रोटीनचे प्रमाण देखील अधिक आहे. गव्हाच्या या वाणाची पेरणी तुलनेने कमी सुपीक जमिनीत देखील केली जाऊ शकते. कमी सुपीक जमिनीतही या जातीपासून चांगले उत्पादन मिळवले जाऊ शकते.

विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे कमी पाणी असेल त्यांनी या वाणाची लागवड केली तर त्यांना कमी पाण्यात चांगले उत्पादन मिळणार आहे. साधारणता गव्हाच्या इतर जातींना पाच ते सहा सिंचनाची गरज भासत असते.

मात्र या सोना-मोती गव्हाच्या वाणाला फक्त तीन सिंचन दिले तरीदेखील चांगले उत्पादन मिळू शकते. या जातीपासून एकरी 12 ते 15 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा देखील केला जात आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा