Wheat Crop Management : गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची ही बातमी विशेष खास राहणार आहे. जर तुम्हीही या रब्बी हंगामात गव्हाची पेरणी केलेली असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास ठरणार आहे. खरे तर गहू हे रब्बी हंगामातील मुख्य पीक आहे.
या पिकाची संपूर्ण राज्यात लागवड केली जाते. राज्यातील अनेक भागात कमी अधिक प्रमाणात गव्हाची पेरणी होते. राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात गव्हाची पेरणी पाहायला मिळते.
यंदा महाराष्ट्रात मान्सून काळात कमी पाऊस झाला असल्याने गहू पेरणी खालील क्षेत्र थोडेसे कमी झाले आहे. तथापि, ज्या भागात पुरेसे पाणी आहे त्या ठिकाणी यंदाही मोठ्या प्रमाणात गहू पेरणी झालेली आहे.
अशा परिस्थितीत अनेकांच्या माध्यमातून गहू पिकातील फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी काय उपाय केला पाहिजे असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
दरम्यान, आज आपण कृषी तज्ञांनी गहू पिकातील फुटवा वाढवण्यासाठी सांगितलेला एक महत्त्वाचा सल्ला जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
गहू पिकातील फुटवा वाढवण्यासाठी काय उपाययोजना कराल
खरेतर गव्हाच्या पिकात फुटव्यांची संख्या जेवढी अधिक असेल तेवढेच अधिक उत्पादन मिळणार आहे. दरम्यान फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी कृषी तज्ञांनी प्रति एकर 40 ते 45 प्रत्येक किलो पर्यंतचे बियाणे वापरावे असा सल्ला दिला आहे.
योग्य प्रमाणात बियाणे वापरल्यास पिकात फुटव्यांची संख्या वाढते. तथापि जर योग्य प्रमाणात बियाणे वापरूनही फुटव्यांची संख्या वाढत नसेल तर शेतकऱ्यांनी काय केले पाहिजे याबाबत कृषी तज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
कृषी तज्ञांनी दिलेले माहितीनुसार गव्हाच्या पिकात फुटवे वाढवण्यासाठी 3 किलो गूळसोबत 25 किलो मोहरी पेंड आणि 1 किलो ह्युमिक ऍसिड 98% यांचे मिश्रण तयार करून पिकाला दिले पाहिजे. हे मिश्रण पहिल्या किंवा दुसर्या सिंचनापूर्वी शेतात टाकण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मोहरी पेंड बारीक करून घ्या आणि मगच त्याचा पिकात वापर करा. यातून तुम्हाला खूप चांगले परिणाम मिळतील. मोहरी पेंड प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया वाढवण्याचे काम करते आणि गूळ मोहरीच्या पेंडची ताकद दुप्पट करते.
यामुळे 25 किलो मोहरी पेंड 50 किलो मोहरीच्या पेंडप्रमाणेच काम करणार आहे. ह्युमिक अॅसिड तुमच्या पिकाला हिरवेपणा आणण्याचे काम करेल. त्यामुळे गव्हाची मुळे वाढतील आणि तुम्हाला आणखी फुटवे येताना दिसतील.