Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्रातील सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात गेल्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी झाली होती.
2019 मध्ये सुरू झालेली ही योजना आजही अविरतपणे सुरू आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाचा लाभ दिला जात आहे. दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या निधीचे वितरण केले जात आहे. एका आर्थिक वर्षात 3 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहेत.
आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना 16 हप्ते मिळाले आहेत. विशेष म्हणजे आगामी 17 व्या हप्त्या संदर्भात देखील महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आगामी सतरावा हप्ता हा लोकसभा निवडणुका पूर्ण झाल्यानंतर जे नवीन सरकार सत्ता स्थापित करेल ते नवीन सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणार आहे.
मागील सोळावा हफ्ता हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ येथील एका शेतकरी कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता. आता या योजनेचा सतरावा हप्ता हा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर चार जून 2024 रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर कधीही जमा होण्याची शक्यता आहे.
काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये या योजनेचा पुढील सतरावा हप्ता हा जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान ज्या शेतकरी बांधवांचे ‘प्रधानमंत्री किसान सम्मान योजने’चे (पीएम-किसान) १७व्या हप्त्याच्या यादीत नाव नसेल तर ते शेतकरी पुन्हा अर्ज करू शकणार आहेत.
यासाठी pmkisan.gov.in वर ‘फार्मर्स कॉर्नर’वर क्लिक करा. रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आधार, मोबाइल नंबर टाकून राज्य निवडा व ‘गेट ओटीपी’वर क्लिक करा. त्यांतर आलेला ओटीपी नंबर टाकून ‘प्रोसिड फॉर रजिस्ट्रेशन’ बटण दाबा.
मोअर डिटेल्समध्ये जाऊन राज्य, जिल्हा, बँक आणि आधार कार्ड ही माहिती भरा. त्यानंतर आधार पडताळणी करून शेतीची माहिती व इतर दस्तावेज अपलोड करायचे आहे. एवढे केल्यानंतर तुमचा पीएम किसान साठीचा अर्ज पूर्ण होईल. मग तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे.