Onion Rate : आज अक्षय तृतीयाचा मोठा सण साजरा झाला आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून अक्षय तृतीयाचा सण साजरा होत असतो. दरम्यान आज अक्षय तृतीयेच्या सणाला महाराष्ट्रातील बाजारांमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे याविषयी आता आपण माहिती पाहणार आहोत.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील सरकारने कांदा निर्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कांदा निर्यात बंदी मागे घेण्याचा मोठा निर्णय घेतला गेला आहे. खरे तर निवडणुकीच्या काळात कांदा निर्यात बंदीचा मुद्दा हा चर्चेत आला होता.
कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळाली होती. दरम्यान ही नाराजी सरकारला निवडणुकीच्या काळात महागात पडणार असे बोलले जात होते. हेच कारण आहे की सरकारने तडकाफडकी निर्यात बंदी माझे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
निर्यात बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि बाजारात कांद्याच्या दरात मोठी सुधारणा देखील पाहायला मिळाली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असे वाटत होते. परंतु बाजारभावातील ही सुधारणा जास्त काळ टिकू शकली नाही. आता पुन्हा एकदा कांद्याचे बाजार भाव रिव्हर्स आले आहेत.
यामुळे शेतकरी बांधवांमागील शुक्लकाष्ट अजूनही पूर्णपणे संपलेले नसल्याचे दिसत आहे. दरम्यान आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर राज्यातील बाजारांमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आता आपण थोडक्यात पाहणार आहोत.
मुंबई कांदा-बटाटा मार्केट : मार्केटमध्ये कांद्याला किमान 1400, कमाल 2000 आणि सरासरी 1700 रुपये भाव मिळाला आहे.
खेड-चाकण कृषी उत्पन्न बाजार समिती : मार्केटमध्ये कांद्याला किमान 1300, कमाल 1800 आणि सरासरी 1500 रुपये भाव मिळाला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती : मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 600, कमाल 1800 आणि सरासरी 1200 रुपये भाव मिळाला आहे.
लासलगाव विंचूर कृषी उत्पन्न बाजार समिती : मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 600, कमाल 2200 आणि सरासरी 1650 रुपये भाव मिळाला आहे.
चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 691, कमाल 2002 आणि सरासरी 1580 रुपये भाव मिळाला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याला किमान 500, कमाल 2100 आणि सरासरी 1450 रुपये भाव मिळाला आहे.
पुणे मोशी कृषी उत्पन्न बाजार समिती : मिळालेल्या माहितीनुसार या मार्केटमध्ये कांद्याला किमान 500, कमाल 1200 आणि सरासरी 850 रुपये असा भाव मिळाला आहे.