Farmer succes story : भारत एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे, देशाची अर्थव्यवस्था (Indian Economy) की संपूर्ण शेती क्षेत्रावर (Farming Sector) आधारित आहे.
बदलत्या काळात शेतीमध्ये आता मोठा बदल देखील बघायला मिळत आहे. मात्र, भारतात प्रत्येक शेतकऱ्याला (Farmers) आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी पर्याप्त अर्थार्जन उपलब्ध होतं नाही.
यामुळे अजूनही शेती व्यवसायात शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पन्न मिळत नाही. मात्र, जर एखाद्या व्यक्तीमध्ये यश संपादन करण्याची प्रचंड लालसा असेल करतो अशक्य देखील शक्य करू शकतो.
असेच एक उदाहरण समोर आले आहे ते बिहार राज्यातून. बिहार राज्यातील एका महिलाने अपुऱ्या संसाधनात भाजीपाला उत्पादित करून दाखवले आहे.
मित्रांनो बिहारच्या छपरा जिल्ह्यातील रहिवासी सुनीता प्रसाद यांना भाजीपाला उत्पादित करायचा होता. मात्र, यासाठी त्यांच्याकडे पुरेशी जागा नव्हती यामुळे त्यांनी चक्क पीव्हीसी पाईपमध्ये भाजीपाला उत्पादित करण्याची किमया साधली आहे.
अशी सुचली भन्नाट कल्पना भाजीपाला पिकवण्याचा छंद हा महिलांना असतोचं मग ती महिला शहरात वास्तव्यास असो किंवा खेड्यात. पण जागा कमी असल्याने अनेकांना त्यांचा छंद जोपासता येतं नाही.
मात्र बिहारच्या सुनीताने आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी एक नवीन आणि अनोखी शक्कल लढवत नवीन मार्ग शोधला आहे. ज्यामध्ये ती कमी जागेत अनेक प्रकारच्या भाज्या पिकवत आहे.
सुनीता यांना सुरुवातीपासून भाजीपाला पिकवण्याची आवड आहे. सुनीता सांगते की, त्यांच्या घरातील कोणतेही भांडे खराब झाले किंवा तुटले की त्या त्यात भाजीपाला लावत असतात.
मात्र सुनीताच्या घरात जागा कमी असल्याने त्यांना जास्त भाजीपाला पिकवता येतं नव्हता. ज्यामुळे तिच्या मनात नेहमीच याबाबत खंत असायची.
पण एके दिवशी ती भंगार विक्रेत्याला घरातील जुन्या वस्तू विकत असताना तिची नजर एका सायकलवर ठेवलेल्या पाईपवर पडली. त्याला पाहून तिला नवीन पद्धतीने भाजीपाला पिकवण्याची कल्पना सुचली.
मग काय सुनीता जशी घरी भांड्यात भाजीपाला लागवड करायची. त्या पद्धतीने तिने पाईपमध्ये भाजीपाला पिकवायला सुरुवात केली आणि आजच्या काळात सुनीता पीव्हीसी आणि बांबूपासून बनवलेल्या व्हर्टिकल गार्डनमध्ये प्रत्येक हंगामात भाजीपाला लागवड करत आहे. आता त्यांच्या गच्चीवर पीव्हीसी पाईप आणि बांबूमध्ये भाज्या लावलेल्या दिसतात.
इतरांनाही भाजीपाला पिकवण्यासाठी करतात प्रेरित सुनीता यांनी इतर लोकांनाही अशा प्रकारे भाजीपाला पिकवण्यास सांगितले, मात्र त्यांनी पीव्हीसी पाईप महाग असल्याचे सांगून नकार दिला. म्हणूनच सुनिताने तिच्या गच्चीवर बांबूपासून उभी बाग तयार केली. या संदर्भात सुनीता सांगतात की, भाजीपाल्याचे रिझल्ट दोन्ही प्रकारे चांगले येत आहेत.
पीव्हीसी पाईप्समध्ये भाजीपाला उत्पादीत करण्याचे तंत्र
»या तंत्रासाठी, आपल्याला एका पाईपची आवश्यकता भासेल. पाईप मध्ये आपल्या सोयीनुसार कट करावे लागेल. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या भाज्यांसाठी बियाणे किंवा रोपे सहज लावू शकता.
»यानंतर या सर्व कट्स मध्ये गांडूळ खत व माती टाकावी.
»भाजीपाल्याला पाणी देण्यासाठी पाईपच्या मध्यभागी पाणी ठेवावे लागेल. त्यामुळे हळूहळू सर्व भाज्यांपर्यंत पाणी सहज पोहोचेल. असे केल्याने पाईपमध्ये पाण्याचे प्रमाण योग्य राहते आणि उत्पादनही चांगले मिळते.
»भाजीपाल्यासाठी शेणखत, कडुलिंबाची पेंड व इतर खते टाकली जाऊ शकतात.