Weather Update: गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात देखील ऋतूंचा लपंडाव चालू आहे. अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे पिकावर विपरीत परिणाम होत आहे. महाराष्ट्राच्या काही भागात मोहरी काढणीला आली असतानाही पुन्हा नव्याने फुले आले आहेत. आता उत्तर भारतात पश्चिमी वारे येवून धडकल्याने जम्मू काश्मीर (Jammu and Kashmir) तसेच उत्तर भारतात देखील अनेक ठिकाणी पावसाची (Rainy weather) शक्यता नोंदविण्यात आली आहे.
मार्च मध्ये पाऊस पडेल काय?
हिवाळ्यात (cold wave) सुद्धा उत्तर भारतातील काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. तर आता मार्च (March) महिन्यातही जोरदार पावसाची (heavy rainfall) शक्यता आहे. म्हणून येत्या तीन दिवसांमध्ये उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पावस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
या ठिकाणी पावसाची शक्यता
पुढील काही तासांत अंदमान बेटांवर (Andaman Islands) जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir), हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) आणि उत्तराखंड (Uttarakhand) परिसरात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस कोसळणार आहे. तसेच पश्चिम हिमालयीन प्रदेशात हलक्या स्वरूपाच्या पावसासह हिमवृष्टीची शक्यता आहे.
असे असेल राज्यातील हवामान
देशातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज दिलेला असला तरी महाराष्ट्रात (Maharashtra) मात्र पुढील काही दिवस हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्यात विदर्भासह मराठवाड्यात(Marathvada havaman) मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढला आहे. तर येत्या दिवसांमध्ये राज्यात तापमान वाढून उन्हाचा चटका बसण्याची शक्यता देखील हवामान खात्याने दिली आहे. महाराष्ट्रात गोंदिया(gondia), गडचिरोली(Gadchiroli), भागात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.