हिवाळ्याला सुरुवात, पण ‘या’ भागात धो-धो पाऊस बरसणार ! IMD चा नवीन अंदाज काय म्हणतोय ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather Update : येत्या काही दिवसात दिवाळीला सुरुवात होणार आहे. पुढील महिन्यात दिवाळीचा मोठा सण सेलिब्रेट होणार आहे. खरंतर दिवाळीपूर्वी महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागत असते. यंदा मात्र हवामानाचा लहरीपणा पाहायला मिळाला आहे. यामुळे यंदा हिवाळ्यात थंडीची तीव्रता वाढणार की नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला होता. मात्र आता महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढू लागला आहे.

राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पहाटेच्या तापमानात मोठी घट पाहायला मिळत आहे. यामुळे आता गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. महाराष्ट्रातील बहुतांशी शहरांमध्ये जम्मू-काश्मीर पेक्षा कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे पुण्यात शुक्रवारी जम्मू-काश्मीर पेक्षा कमी किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी पुण्यातील किमान तापमान 12.8 डिग्री सेल्सिअस एवढे नोंदवले केले आहे.

तर जम्मू मध्ये 14.6 डिग्री सेल्सिअस एवढे तापमान शुक्रवारी नोंदवले गेले आहे. विशेष म्हणजे राज्यातील सर्वात कमी किमान तापमान जळगावात नमूद करण्यात आले आहे. शुक्रवारी जळगावात 10.9° c एवढे किमान तापमान नमूद करण्यात आले आहे. एकंदरीत आता राज्यात गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे असे म्हणायला काही हरकत नाही. मात्र असे असले तरी राज्यातील काही भागात अजूनही कमाल तापमान फारशी घट झालेली नाही.

परंतु आगामी काही दिवसात यामध्ये देखील घट येईल आणि गुलाबी थंडीला सर्वत्र सुरुवात होईल असा अंदाज आहे. अशातच आता हवामान खात्याने देशातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने एक नवीन हवामान अंदाज सार्वजनिक केला आहे. यामध्ये देशातील काही भागात पाऊस पडेल अस सांगितलं गेल आहे. दक्षिण भारतातील किनारी आंध्र प्रदेश, केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल येथे काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज, केरळ आणि माहे येथे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि गडगडाटी वादळासह पाऊस पडू शकतो. तसेच आज या भागात वाऱ्याचा वेग ताशी 30-40 किमी राहणार असा अंदाज आहे. तसेच आंध्र प्रदेशच्या किनारी भागात, यानम, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये पावसाची तसेच विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे. दक्षिण भारतात आगामी काही दिवस पाऊस असाच कोसळत राहणार आहे.

सध्या केरळ, माहे, तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये पाऊस सुरू आहे. 28-30 ऑक्टोबर दरम्यान तामिळनाडू आणि केरळमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर या संबंधित भागातून पाऊस गायब होणार आहे. तर 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी दक्षिण अंतर्गत कर्नाटकात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, तुरळक वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पण देशातील उर्वरित भागात प्रामुख्याने कोरडे हवामान राहणार असा अंदाज आहे. आपल्या राज्यात मात्रआज हवामान कोरडे राहणार आहे. सोमवारी आणि मंगळवारी मात्र महाराष्ट्रातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातील आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात सोमवारी आणि मंगळवारी पाऊस बरसेल असे आयएमडीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा