शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, यंदा उन्हाळ्यात सुपर एल निनो ! पुढील पावसाळ्यावर काय परिणाम होणार ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather Update : यावर्षीचा मान्सून आता अंतिम टप्प्यात आला आहे. देशातील विविध राज्यांमधून मान्सून परतला आहे. तर काही राज्यात अजूनही मान्सून सक्रिय आहे. महाराष्ट्रातही काही भागात अद्याप मान्सून सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे. पण येत्या काही दिवसात महाराष्ट्रातून मान्सून पूर्णपणे माघारी फिरणार आहे.

अशातच देशातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी एक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे यंदाच्या उन्हाळ्यात सुपर एल निनोचा प्रभाव पाहायला मिळणार आहे. यामुळे उन्हाळ्यात तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, उन्हाळ्यात सुपर एल निनो आला तर याचा पुढील पावसाळ्यावर काय परिणाम होऊ शकतो ? याबाबत आज आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यावर्षी कमकुवत मान्सूनमुळे चिंता वाढली !

खरंतर, यावर्षी अगदी सुरुवातीपासूनच मानसूनवर एल निनोचा प्रभाव पाहायला मिळाला आहे. एल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी सुरुवातीला मान्सूनचे उशिराने आगमन झाले. खरंतर दरवर्षी मानसून केरळमध्ये एक जूनला येतो. एक जूनला मान्सून दाखल झाल्यानंतर सात जूनच्या सुमारास महाराष्ट्राच्या मुख्य भूमीत म्हणजेच तळ कोकणात येतो. मग तेथून पुढे 11 जूनच्या सुमारास राजधानी मुंबईत मानसून येतो आणि हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पसरतो. दरवर्षी 15 जूनच्या सुमारास मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात पसरतो. पण यावर्षी मान्सून 25 जूनला आला.

यामुळे जून महिन्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस बरसला. यानंतर जुलै महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची हजेरी लागली. यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. परंतु ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला. यामुळे खरिपातील पिकांवर विपरीत परिणाम झाला. ऐन वाढीच्या अवस्थेत पावसाचा खंड पडला परिणामी पिकाची योग्य पद्धतीने वाढ झाली नाही आणि यामुळे उत्पादनात मोठी घट आली.

दरम्यान सप्टेंबर महिन्यात राज्यातील काही भागात चांगला जोरदार पाऊस झाला. परंतु जून आणि ऑगस्ट या दोन महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला असल्याने यावर्षी राज्यात सरासरी एवढा पाऊस झाला नाही. याचा परिणाम म्हणून राज्यातील अनेक भागात पाण्याचे संकट पाहायला मिळत आहे. विशेषता उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रातील काही भाग आणि मराठवाड्यात दुष्काळाची झळ अधिक आहे.

अशातच आता उन्हाळ्यात सुपर एलनिनो राहणार असा दावा केला आहे. त्यामुळे आज आपण या सुपर एल निनोमुळे पुढील पावसाळ्यावर काही विपरीत परिणाम होणार का आणि उन्हाळ्यात कसं हवामान राहू शकते याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

उन्हाळ्यावर काय परिणाम होणार

सुपर एल निनोमुळे उन्हाळ्यात नेहमीपेक्षा 1.5 अंश सेल्सिअस अधिकचे तापमान पाहायला मिळणार आहे. एवढेच नाही तर तापमान दोन अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त राहू शकते. तापमान दोन अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असण्याची शक्यता 30 टक्के आहे. अमेरिकेतील ‘नॅशनल ओशनिक अ‍ॅण्ड अ‍ॅटमोस्फेरिक एडमिनिस्टेशन’ (नोआ) या संस्थेने भारतात यंदा सुपर एल निनोचा प्रभाव राहणार असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान या परिस्थितीमुळे देशातील विविध भागात उन्हाळ्यात तापमान वाढ, दुष्काळ आणि पूर अशी परिस्थिती पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे याचा मान्सूनवर देखील विपरीत परिणाम होऊ शकतो असे सांगितले जात आहे. यामुळे आता पुढील मानसून देखील यावर्षीच्या मान्सून प्रमाणेच कमकुवत राहणार का ही मोठी भीती शेतकऱ्यांना भेडसावत आहे.