Weather Update : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे पावसा संदर्भात. काल भारतीय हवामान खात्याने राज्यातील विविध भागांमधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचे जाहीर केले आहे. आतापर्यंत राज्यातील जवळपास 45% भागांमधून मान्सून माघारी फिरला असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
विशेष म्हणजे येत्या दोन ते तीन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरणार असा अंदाज आहे. दरम्यान इगतपुरीच्या ग्रामीण कृषी हवामान केंद्राने देखील परतीच्या पावसाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.त्यानुसार नाशिक जिल्ह्यात आज पासून पुढील पाच ते सहा दिवस हवामान स्वच्छ आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे.
या कालावधीमध्ये काही भागात अंशता ढगाळ हवामान राहील पण प्रामुख्याने आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज आहे.एवढेच नाही तर हवामानाशास्त्र विभागाच्या अभ्यासकांनी दहा ते पंधरा ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण राज्यात परतीचा पाऊस हजेरी लावणार असल्याचे सांगितले आहे.
हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे दहा ते पंधरा ऑक्टोबर दरम्यान राज्यात परतीचा पाऊस होईल आणि या कालावधीमध्ये 100 मिलिमीटर पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे.एवढेच नाही तर हवामान शास्त्र विभागातील तज्ञांनी दिवाळीमध्ये देखील यावर्षी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
दहा ते पंधरा नोव्हेंबर दरम्यान बंगालच्या उपसागरात छोटे वादळ तयार होईल आणि याचा परिणाम म्हणून राज्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिवाळीच्या कालावधीत एका दिवसासाठी राज्यात यंदा पावसाची हजेरी लागणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान यावर्षी महाराष्ट्रात आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पावसाची हजेरी लागली आहे.
यंदा महाराष्ट्रात जून आणि ऑगस्ट या दोन महिन्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडला. मात्र जुलै आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यात चांगला पाऊस झाला आहे. परंतु असे असले तरी यंदा राज्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पाहायला मिळत आहे.
यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा फक्त 96 टक्के पावसाची नोंद करण्यात आले आहे. काही भागात समाधानकारक पाऊस झाला आहे तर काही ठिकाणी मात्र अजूनही अपेक्षित असा पाऊस झालेला नाही. यामुळे निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्यातील शेतकरी यावर्षी मोठ्या चिंतेत पाहायला मिळत आहेत.