Weather Update : आज अहमदनगरसह ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता, भारतीय हवामान विभागाचा अलर्ट जारी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather Update : सध्या राज्यात परतीचा पाऊस (Monsoon News) चांगलाच कोसळत आहे. राज्यातील काही विभागातून मान्सून (Monsoon Rain) परतला आहे. मात्र असे असले तरी राज्यातील अनेक जिल्ह्यात अजूनही परतीचा पाऊस जोरदार कोसळत आहे. राज्यात सुरू असलेला परतीच्या पावसाचा (Rain) आता जोर कमी झाला आहे.

मात्र असे असले तरी आज देखील राज्यात पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने (IMD) नमूद केले आहे. दरम्यान सध्या कोसळत असलेल्या पावसामुळे महाराष्ट्रातील शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. सध्या राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात खरीप हंगामातील मका, सोयाबीन, तूर इत्यादी पिकांची काढणी प्रगतीपथावर आहे. अशा परिस्थितीत सध्या कोसळत असलेल्या परतीचा पाऊस खरीप हंगामातील काढणीसाठी तयार झालेल्या शेती पिकांना घातक ठरत आहे.

यामुळे शेतकरी बांधवांना (Farmer) हजार रुपयांचा भुर्दंड नाहक सहन करावा लागत आहे. शिवाय आगामी काही दिवस राज्यात पावसाची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांची डोकेदुखी अजूनच वाढली आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते आज राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विशेषतः दक्षिण भागात पावसाची शक्यता आहे. या विभागातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

अशा परिस्थितीत संबंधित विभागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जाणकार लोकांकडून केले गेले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. काल राज्यातील मराठवाड्यात पावसाची हजेरी पाहायला मिळाली. काल मराठवाड्यात झालेला पाऊस हलका ते मध्यम स्वरूपाचा नमूद करण्यात आला आहे. मात्र असे असले तरी ऐन काढणीच्या वेळी येणारा पाऊस पिकांसाठी घातक आहे. 

आज या जिल्ह्यात कोसळणार पाऊस

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अद्ययावत माहितीनुसार आज कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात विजाच्या कडकडाटासह पावसाची शक्‍यता असून या अनुषंगाने या जिल्ह्यांना येलो ॲलर्ट जारी करण्यात आला आहे.

तसेच आज मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी देखील भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच बीड, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या मराठवाड्यातील जिल्ह्यांना आणि बुलडाणा, वाशीम, यवतमाळ या विदर्भातील जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता लक्षात घेता भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment