Weather Update : हवामान विभागाचा अंदाज…! आज विदर्भासह ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather Update : महाराष्ट्रात सर्वत्र पावसाची (Rain) उघडीप पाहायला मिळत आहे. आता राज्यात पावसाचा (Monsoon) जोर चांगलाच कमी झाला आहे. राज्यात जवळपास सर्वत्र पावसाची (maharashtra rain) विश्रांती पाहायला मिळत आहे. मात्र असे असले तरी, भारतीय हवामान विभागाने (imd) आज देखील राज्यात पाऊस (Monsoon) कोसळणार असल्याचे सांगितले आहे.

भारतीय हवामान विभागाच्या मते, राज्यात परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. आज राज्यात विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. या अनुषंगाने भारतीय हवामान विभागाने विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील जळगाव जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केला आहे.

विदर्भातील सर्व जिल्हे मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे वगळता सर्व जिल्हे आणि खानदेशातील जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवली गेली आहे. भारतीय हवामान विभागाने या विभागांना येलो अलर्ट जारी केला असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे.

मित्रांनो भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दहा ऑक्टोबरपर्यंत राज्यातून मान्सून माघारी फिरणार आहे. निश्चितच आता मान्सून अंतिम टप्प्यात आला आहे. अशा परिस्थितीत राज्यात परतीचा पाऊस कोसळत असल्याने निश्चितच आगामी रब्बी हंगामात याचा फायदा होणार आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की अलर्ट म्हणजे त्या विभागात हलक्या पावसाची शक्यता असते.

अशा विभागात हलक्‍या पावसाची शक्‍यता असली तरीदेखील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन या अलर्टच्या माध्यमातून भारतीय हवामान विभाग करत असतं. मित्रांनो, यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार या वर्षी राज्यात सरासरीपेक्षा 23 टक्के अधिक पाऊस झाला आहे.

निश्चितच त्यामुळे रब्बी आणि उन्हाळी हंगामात शेतकरी बांधवांना पाण्याची कमतरता भासणार नसल्याचे सांगितले जात आहे. खरं पाहता खरीप हंगामात जास्तीच्या पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला होता. मात्र आता या जास्तीचा पावसाचा फायदा रब्बी हंगामात आणि उन्हाळी हंगामात शेतकर्‍यांना होणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment