Weather Update : ‘या’ राज्यात जोरदार पावसाची शक्यता, महाराष्ट्रात देखील ‘या’ जिल्ह्यात कोसळणार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather Update : भारतात सर्वत्र परतीचा पाऊस (Rain) धुमाकूळ घालत आहे. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत भारतातील अनेक राज्यांना पावसाचा फटका बसत आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील राजधानी मुंबईसह अनेक जिल्ह्यात परतीचा पाऊस (Monsoon) बरसत आहे.

दिल्ली-एनसीआरपासून मुंबईपर्यंत विविध शहरांतील पावसाची (Monsoon News) प्रक्रिया थांबण्याचे नाव घेत नाही आहे. त्याचबरोबर डोंगराळ भागात देखील मुसळधार पाऊस (Maharashtra Rain) पडत आहे. काल महाराष्ट्रात मुंबई ठाणे औरंगाबाद पालघर जळगाव नंदुरबार धुळे पुणे या जिल्ह्यात पावसाने (Rain Alert) जोरदार हजेरी लावली आहे.

भारतीय हवामान विभागाने आज देखील महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचे स्पष्ट केले आहे. हवामान खात्याच्या (IMD) म्हणण्यानुसार जवळपास 17 राज्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे.

त्याच वेळी, IMD ने आज, 9 ऑक्टोबर रोजी दिल्ली-NCR मध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. देशाच्या पूर्व भागात चक्री वाऱ्यांचा दबाव असल्याची माहिती हवामान खात्याने दिली. आपल्या महाराष्ट्रातही हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.

या भागात होणार मुसळधार पाऊस

IMD नुसार, दक्षिण-पूर्व दिल्ली, नोएडा, दादरी, ग्रेटर नोएडा, फरिदाबाद, मानेसर, बल्लभगड, पानिपत, गोहाना, सोहाना, पलवल, नूह, होडल आणि लगतच्या भागात हलका ते मध्यम तीव्रतेचा पाऊस पडेल. त्याचबरोबर येत्या काही तासांत शामली, मुझफ्फरनगर, चंदपूर, अमरोहा, मुरादाबाद, गढमुक्तेश्वर, रामपूर, संभल, चंदौसी, खुर्जा, नरोरा, बदायूं, अलीगढ, कासगंज, नांदगाव, हाथरस, मथुरा, एटासह अनेक भागात पाऊस पडेल. त्याचवेळी राजस्थानमध्येही पावसाची प्रक्रिया सुरू आहे.

भारतीय हवामान खात्याने (IMD) उत्तराखंड, पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थानमध्ये 10 ऑक्टोबरपर्यंत मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज वर्तवला आहे. राष्ट्रीय राजधानीबद्दल बोलायचे झाले तर दिल्लीत आज (रविवार) 9 ऑक्टोबरला कमाल तापमान 24 आणि किमान तापमान 21 अंशांपर्यंत असू शकते. 10 ऑक्टोबरलाही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच तापमानातही किंचित वाढ होणार आहे. तर 12 ऑक्टोबरपासून हवामान पूर्णपणे कोरडे होईल आणि 15 ऑक्टोबरपर्यंत कमाल तापमान पुन्हा 30 अंशांपर्यंत पोहोचणार आहे.

महाराष्ट्रात कुठं कोसळणार पाऊस

भारतीय हवामान विभागाने आज महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचे स्पष्ट केले आहे. हवामान विभागाच्या मते आज महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. या विभागासाठी भारतीय हवामान विभागाकडून आज येलो अलर्ट जारी झाला आहे. तसेच पुढील तीन ते चार दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

सध्या खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने या पावसाचा या काढणीयोग्य पिकांना मोठा फटका बसत आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात सध्या सोयाबीनची काढणी सुरू आहे. उत्तर महाराष्ट्रात आणि राज्यातील इतर भागात खरीप हंगामातील मका पिकाची देखील काढणी आता प्रगतीपथावर आली आहे. अशा परिस्थितीत सध्या कोसळत असलेला हा पाऊस काढणीसाठी तयार झालेल्या पिकांची नासाडी करत आहे. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment