Weather Update : काल आपण सर्वांनी मकर संक्रांतीचा पर्व साजरा केला आहे. आता, दिवसाचा कालावधी वाढणार आहे. तसेच आज पासून खऱ्या अर्थाने हळूहळू थंडीचा जोर देखील कमी होत जाणार आहे. अशातच मात्र देशातील हवामानात पुन्हा एकदा महत्त्वाचा बदल पाहायला मिळत आहे.
देशातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे देशाच्या उत्तरेकडील भागात थंडीची लाट आली आहे.
थंडीची लाट आली असल्याने उत्तरेकडील काही राज्यांना हवामान खात्याचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश मधील काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश मधील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याशिवाय राष्ट्रीय राजधानी दिल्लीतही किमान तापमान दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. यामुळे तेथे देखील गारठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
हरियाणा मध्ये देखील आगामी काही दिवस थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. थंडी आणि दाट धुक्याची शक्यता लक्षात घेता हरियाणा आणि दिल्लीमधील काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी झाला आहे.
याशिवाय देशातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा देखील अंदाज आहे. देशातील काही भागात हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होईल असे आयएमडीने स्पष्ट केले आहे.
आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे आज आणि उद्या म्हणजेच 16 आणि 17 जानेवारीला जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये वेगळ्या ठिकाणी पावसासह बर्फ वृष्टी होण्याचा अंदाज आहे.
या परिसरात हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आयएमडीच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. आज देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये काही भागात पावसाची शक्यता आहे. पण देशातील ईशान्य पावसाचा जोर आता पूर्णपणे थांबलेला आहे.
तसेच आपल्या महाराष्ट्रात देखील आगामी काही दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे राहील आणि थंडीचा जोर वाढेल असे आयएमडीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पोषक हवामान तयार होणार आहे.