Watermelon Farming : कलिंगड हे उन्हाळ्यात सर्वात मागणीमध्ये असलेले फळ आहे. या फळाला उन्हाळ्यात मोठी मागणी असते. हेच कारण आहे की, शेतकरी बांधव या फळाची मोठ्या प्रमाणात लागवड करतात.
हे वेलवर्गीय पीक आपल्या महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात उत्पादित होते. राज्यातील विविध भागात कलिंगडची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
या हंगामी पिकांच्या शेतीतून शेतकऱ्यांना चांगली कमाई देखील होत आहे. दरम्यान, ज्या शेतकरी बांधवांनी या हंगामात वेळेवर कलिंगड लागवड केलेली असेल त्यांचे कलिंगड आता हार्वेस्टिंगसाठी तयार होणार आहे.
कलिंगडचे पीक फक्त आणि फक्त 65 ते 90 दिवसांनी तयार होत असते. म्हणजेच या पिकाचा परिपक्व कालावधी हा जास्तीत जास्त तीन महिन्यांचा असतो.
खरंतर अनेक शेतकऱ्यांचे कलिंगड पीक आता हार्वेस्टिंगसाठी तयार होणार असल्याने आता आपण कलिंगडची हार्वेस्टिंगसाठी तयार झाले आहे हे कसे ओळखले जाऊ शकते, याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कलिंगड हार्वेस्टिंगसाठी तयार झाले हे कसं ओळखणार
कलिंगड पीक काढणी करण्यापूर्वी सात ते आठ दिवस आधीच पाणी देणे बंद केले पाहिजे. फळ तयार झाले की नाही हे ओळखण्यासाठी फळावर टिचकी मारली पाहिजे, तयार फळाचा टणटण असा आवाज येतो.
तसेच तयार फळांचा जमिनीलगतचा रंग हा पिवळसर बनत असतो. तयार फळ असले की त्याचे देठावरील तंतू हे सुकलेले असतात.
दरम्यान सूर्याच्या किरणापासून कलिंगडचे पीक वाचवण्यासाठी त्यावर गवताचा लेअर टाकला पाहिजे. कारण की, सूर्याच्या किरणामुळे कलिंगडच्या फळाची खालची बाजू पिवळसर बनते.
यामुळे कलिंगड फळ गवताने झाकले पाहिजे. असे केल्यास शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादन मिळणार आहे. तथापि कलिंगड पीक तयार झाल्यानंतर वेळेवर त्याचे हार्वेस्टिंग करणे आवश्यक असते.
यामुळे कलिंगड फळ काढणीस तयार झाले आहे की नाही हे ओळखून शेतकऱ्यांनी वेळेवर हार्वेस्टिंग करणे आवश्यक असते.