तुमच मतदान कार्ड हरवलंय ? मग येथून डाउनलोड करा Voter ID Card, वाचा सविस्तर प्रोसेस

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Voter ID Card Download : पुढील वर्षी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आणि महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य शासनाकडून सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी विविध निर्णय घेतले जात आहेत.

येत्या निवडणुकांमध्ये विजयी पताका फडकवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत यासोबतच विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील आगामी निवडणुकीसाठी आत्तापासूनच कंबर कसली आहे. आता सर्वत्र निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. दरम्यान आगामी निवडणुकीत मतदान करण्यासाठी लोकांना मतदान कार्ड लागणार आहे.

ज्या लोकांचे मतदान कार्ड हरवले आहे त्या लोकांना आता अगदी सहजतेने डुप्लिकेट मतदान कार्ड बनवता येणार आहे. खरे तर मतदान कार्डचा वापर फक्त निवडणुकीत मत देण्यासाठीच होतो असे नाही तर या व्यतिरिक्तही मतदान कार्ड विविध शासकीय कामांसाठी उपयोगी येते.

हे एक प्रमुख शासकीय डॉक्युमेंट आहे. आता आपण डुप्लिकेट वोटर आयडी कार्ड कसे काढले जाऊ शकते, यासाठी कुठे अर्ज करावा लागणार याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.

डुप्लिकेट मतदार कार्डसाठी अर्ज कसा करावा लागणार बर 

यासाठी सर्वप्रथम राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याच्या वेबसाइटवरून फॉर्म EPIC-002 ची प्रत डाउनलोड करावी लागणार आहे. आता हा फॉर्म काळजीपूर्वक भरावा लागणार आहे.

यासोबतच, काही कागदपत्रे देखील सादर करावी लागणार आहेत. यामध्ये वोटिंग आयडी कार्ड हरवल्याची FIR कॉपी, पत्त्याचा पुरावा आणि ओळखीचा पुरावा सादर करावा लागणार आहे.

नंतर मग तुमच्या स्थानिक निवडणूक कार्यालयात फॉर्म सबमिट करायचा आहे. जिथे तुम्हाला संदर्भ क्रमांक दिला जाईल. तुम्ही हा नंबर वापरून राज्य निवडणूक कार्यालयाच्या वेबसाइटवर तुमच्या अर्जाची स्थिती ट्रॅक करू शकता.

तुमचा डुप्लिकेट मतदान कार्ड बनवण्यासाठी सादर करण्यात आलेल्या अर्जाची पडताळणी केली जाईल. एकदा की ही पडताळणी पूर्ण झाली की तुमचे डुप्लिकेट मतदान कार्ड तयार होते. मग तुम्ही हे कार्ड निवडणूक कार्यालयात जाऊन घेऊ शकता 

डुप्लिकेट वोटिंग कार्डसाठी कोणती कागदपत्रे लागतात बर ?

मतदार कार्ड हरवल्यास तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल करावी लागते. तसेच ही एफआयआरची प्रत डुप्लिकेट मतदान कार्ड बनवण्यासाठी सादर करावी लागते.

तसेच फॉर्म EPIC-002 द्यावा लागतो. याशिवाय, पत्त्याचा पुरावा, ओळखीचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी कागदपत्रे तुम्हाला सादर करावी लागतात. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा