Vegetable Farming : भारतात पारंपारिक पिकांच्या शेती सोबतच मोठ्या प्रमाणात फळबागांची लागवड केली जाते. याशिवाय अलीकडे तरकारी पिकांची देखील मोठ्या प्रमाणात शेती केली जाऊ लागली आहे. तरकारी अर्थातच भाजीपाला लागवड शेतकऱ्यांसाठी विशेष फायद्याची ठरत आहे.
दरम्यान आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी फेब्रुवारी ते जून या कालावधीमध्ये कोणत्या भाजीपाला पिकांची लागवड केल्यास त्यांना चांगले उत्पादन मिळू शकते याविषयी महत्त्वाची माहिती घेऊन हजर झालो आहोत.
खरे तर कमी कालावधीत आणि कमी खर्चात अधिकचे उत्पन्न मिळत असल्याने अलीकडे भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होऊ लागली आहे. भाजीपाला पिकांची शेती शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने फायदेशीर ठरत आहे.
बाजारात 12 महिने भाजीपाल्याला मागणी असते. यामुळे विविध भाजीपाला पिकांची बारा महिने लागवड केली जाऊ शकते. मात्र कोणत्या महिन्यात कोणता भाजीपाला पिकवला पाहिजे याविषयी अनेकांच्या माध्यमातून विचारणा केली जात होती.
दरम्यान आज आपण याच प्रश्नाचे उत्तर थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कृषी तज्ञांनी कोणत्या महिन्यात कोणत्या भाजीपाला पिकाची लागवड करण्याचा सल्ला दिला आहे हे आता आपण थोडक्यात पाहणार आहोत.
फेब्रुवारी : कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या चालू फेब्रुवारी महिन्यात शेतकरी बांधवांनी वांगी, टोमॅटो, काकडी, दुधी, भोपळा, कारली, दोडका, कलिंगड, खरबूज, घेवडा, रताळी, ढेमसे या भाजीपाला पिकांची लागवड केल्यास त्यांना चांगले उत्पादन मिळू शकणार आहे.
मार्च : शेतकऱ्यांनी मार्च महिन्यात वांगी, काकडी यांसारख्या भाजीपाला पिकांची लागवड केली पाहिजे.
एप्रिल : एप्रिल मध्ये आलं, टोमॅटो या भाजीपाला पिकांची शेती केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळणार आहे.
मे : या महिन्यात आलं, टोमॅटो, फुलकोबी, हळद यांसारख्या भाजीपाला पिकांची लागवड केली जाऊ शकते.
जून : खरे तर जून महिन्यात खरीप हंगामातील पिकांची पेरणी सुरू होते. मात्र अनेक शेतकरी बांधव खरीप पिकांसोबतच भाजीपाला पिकांची देखील लागवड करतात. दरम्यान कृषी तज्ञांनी जून महिन्यांमध्ये हळद, वांगी, भेंडी, कोथिंबीर, मिरची, टोमॅटो, वाल, फुलकोबी, बटाटा, काकडी, कारली, दोडका, कलिंगड, खरबूज, मेथी, गवार, घेवडा, रताळी, अळू, शेवगा, शेपू या भाजीपाला पिकांची शेती करण्याचा सल्ला दिला आहे.