Vegetable Farming : ऑक्टोबर महिन्यात ‘या’ भाजीपाला पिकांची शेती सुरु करा, हिवाळ्यात होणार जंगी कमाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vegetable Farming : मित्रांनो आपल्या देशात फार पूर्वीपासून भाजीपाला पिकांची (Vegetable Crop) शेती केली जात आहे. मात्र गेल्या काही वर्षांत भारत हा एक मोठा भाजीपाला उत्पादक देश म्हणून उदयास आला आहे.

देशाच्या विविध भागात पिकवलेल्या भाज्या आज परदेशात निर्यात होत आहेत. आपल्या महाराष्ट्रात देखील भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. भाजीपाला पिकासाठी आपल्याकडे तरकारी पिके म्हणून देखील ओळखले जाते.

भाजीपाला पिकांच्या शेतीतून शेतकरी बांधवांना (Farmer) अल्पावधीतच चांगली कमाई (Farmer Income) होत असल्याने अलीकडे भाजीपाला शेतीकडे शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात आकृष्ट होत असल्याचे चित्र आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी अनेक प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करून बंपर उत्पादन घेतले आहे.

बहुतांश राज्यांमध्ये खरीप पिकांची (Kharif Season) काढणीही सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी भाजीपाला लागवडीची तयारी, खते, बियाणे इत्यादी करू शकतात. मित्रांनो शेतकरी बांधव आता हिवाळ्यात चांगले उत्पादन देणाऱ्या भाजीपाला पिकांची शेती करू शकतात. अशा परिस्थितीत आज आपण हिवाळ्यात लागवड (Farming) केल्या जाणाऱ्या भाजीपाला पिकांची माहिती जाणून घेणार आहोत.

बटाट्याची शेती :- रब्बी हंगामातील प्रमुख भाजीपाला पिकांमध्ये बटाट्याचे नाव अग्रस्थानी येते. अनेक भागात वर्षभर त्याची लागवड केली जात असली तरी हिवाळ्यात त्याची पेरणी, उत्पादन आणि साठवणूक ही सर्व कामे अगदी सहज होतात. ही जमिनीच्या आत उगवणारी कंदवर्गीय भाजी आहे, ज्याची लागवड करण्यापूर्वी खोल नांगरणी करून शेत तयार केले जाते. यानंतर 15 ते 20 दिवसांनी खत टाकून बियाणे पेरले जाते.

वाटाणा शेती :- मटार किंवा वाटाणा हे रब्बी हंगामातील मुख्य भाजीपाला पीक देखील आहे, ज्याची पेरणीची वेळ ऑक्टोबर ते नोव्हेंबर पर्यंत असते. वर्षभर वापरण्यासाठी मटारची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते, त्यानंतर मटारांवर प्रक्रिया केली जाते आणि फ्रोजन मटर बनवले जातात. मटारच्या लवकर पेरणीसाठी 120-150 किलो बियाणे आणि उशिरा पेरणी केल्या जाणाऱ्या जातींसाठी 80-100 किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे.

लसणाची शेती :- स्वयंपाकघरात वर्षभर वापरल्या जाणाऱ्या भाज्यांमध्ये लसणाचे देखील नाव समाविष्ट आहे. अनेक शेतकरी लसणाची लागवड करतात. लसनातं औषधी गुणधर्म आढळत असल्याने याला कायम मागणी असते. पेरणीसाठी हेक्टरी 500 ते 700 किलो बियाणे पुरेसे आहे. लसूण पेरणीसाठी एका ओळीत पेरा. यासाठी लसणाच्या कंदांची प्रक्रिया केल्यानंतर 15×7.5 सेमी अंतरावर पेरणी करावी.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment