Varsova Virar Sea Link Project : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईचा गेल्या काही दशकांमध्ये मोठा विस्तार झाला आहे. शहराचे विस्तारीकरण तर झालेच आहे शिवाय औद्योगिकीकरण आणि नागरीकरण यामुळे शहरातील लोकसंख्या आधीच्या तुलनेत दुपटीने वाढली आहे.
सोबतच शहरालगत असलेल्या उपनगरांचा देखील गेल्या काही दशकांमध्ये मोठा विस्तार झाला आहे. यामुळे शहरात आणि उपनगरात लोकसंख्येचा ग्राफ मोठा वाढला आहे. यामुळे सध्या स्थितीला शहरात आणि उपनगरात असलेली वाहतूक व्यवस्था तोकडी ठरत आहे.
यामुळे वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध प्रयत्न केले जात आहेत. याचा प्रयत्नचा एक भाग म्हणून वर्सोवा ते विरार दरम्यान सी लिंक रोड तयार केला जात आहे. दरम्यान याच सी लिंक प्रकल्पाबाबत एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहेत.
खरंतर सुरुवातीला वर्सोवा ते वांद्रे असा सी लिंक म्हणजेच सागरी सेतू विकसित करण्याचा निर्णय झाला होता. यानंतर याचा विस्तार वांद्रे ते वर्सोवा आणि वर्सोवा ते विरार पर्यंत करण्याचे नियोजन एमएमआरडीएने आखले होते. यानुसार या प्रकल्पाचे सद्यस्थितीला युद्ध पातळीवर काम सुरू आहे.
यासोबतच एमएमआरडीएने वर्सोवा ते पालघर पर्यंत या प्रकल्पाचा विस्तार होईल अशी घोषणा देखील गेल्या काही दिवसांपूर्वी केली होती. हीच घोषणा आता प्रत्यक्षात खरी ठरणार आहे. कारण की हा प्रकल्प पालघर पर्यंत वाढवण्यासाठी हालचाली वाढवण्यात आल्या आहेत.
हाती आलेल्या माहितीनुसार, एम एम आर डी ए च्या माध्यमातून वर्सोवा ते विरार सी लिंक प्रकल्प पालघर पर्यंत विस्तारित करण्यासाठी आवश्यक असलेला सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी आणि वर्सोवा ते विरार मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे पुनरावलोकन करण्यासाठी सल्लागार नेमला जाणार आहे.
यासाठी मंगळवारी अर्थातच 7 नोव्हेंबर 2023 रोजी एमएमआरडीएने निविदा मागविल्या आहेत. यामुळे आता मुंबईहून थेट पालघर पर्यंत सागरी सेतुने प्रवास करता येणार आहे. परिणामी या परिसरातील नागरिकांचा प्रवास गतिमान होईल आणि वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.
एम एम आर डी ए ने हाती घेतलेला हा प्रकल्प पूर्णपणे तयार झाल्यानंतर नरिमन पॉईंट ते वरळी वरून थेट पालघर पर्यंत समुद्र मार्गाने प्रवास करता येणार आहे. सध्या वांद्रे ते वर्सोवा या 17 किलोमीटर लांबीच्या सी लिंक प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
याशिवाय वर्सोवा ते विरार मार्गासाठी आवश्यक असलेल्या खर्चासाठी जपानच्या एका कंपनीकडून कर्ज मिळणार आहे. यामुळे वर्सोवा ते विरार या 42.75 किलोमीटर लांबीच्या सी लिंकच्या कामाला देखील लवकरच सुरुवात होणार आहे. यासाठी जवळपास 63 हजार 424 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
विशेष म्हणजे हा मार्ग आता थेट पालघर पर्यंत वाढवला जाईल. सध्या विरार ते पालघर हे अंतर 54.6 किलोमीटर एवढे आहे. मात्र सी लिंक प्रकल्प पालघर पर्यंत गेल्यानंतर त्यानंतर बऱ्यापैकी कमी होईल आणि या भागातील प्रवाशांचा प्रवास जलद होईल असे बोलले जात आहे.