वंदे भारत एक्सप्रेसपेक्षा वंदे साधारण एक्सप्रेसचे तिकीट दर किती स्वस्त राहणार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vande Sadharan Train : देशात 2019 मध्ये वंदे भारत एक्सप्रेस लॉन्च करण्यात आली. सर्वप्रथम ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर सुरु झाली. यानंतर टप्प्याटप्प्याने सर्वच महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला हिरवा झेंडा दाखवला जात आहे. आतापर्यंत देशातील 34 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे या गाडीला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद देखील दाखवला जात आहे. आतापर्यंत आपल्या महाराष्ट्राला सुद्धा सहा वंदे भारत एक्सप्रेस मिळाल्या आहेत. या गाडीची लोकप्रियता पाहता आगामी काही महिन्यात आणखी काही महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू होणार आहे.

मात्र या गाडीसाठी आकारले जाणारे तिकीट दर हे खूपच अधिक आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी ही गाडी सुरू झालेली नाही असा आरोप केला जातो. महागड्या तिकीट दरामुळे इच्छा असूनही सर्वसामान्यांना या गाडीने प्रवास करता येत नाही.

त्यामुळे आता वंदे भारत एक्सप्रेसच्या धर्तीवर वंदे साधारण ट्रेन सुरू केली जाणार आहे. वंदे साधारण एक्सप्रेस मात्र नॉन एसी गाडी राहणार आहे. दरम्यान या वंदे साधारण एक्सप्रेस ट्रेनला अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन असे नाव देण्यात आले आहे.

या अमृतभारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये वंदे भारत एक्सप्रेस प्रमाणेच सोयीसुविधा राहणार आहेत. मात्र ही गाडी लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वापरली जाणार आहे. 800 किलोमीटर पेक्षा अधिक लांबीच्या मार्गावर अमृतभारत एक्सप्रेस ट्रेन चालवली जाईल अशी माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे ही गाडी दिवसा आणि रात्री चालवली जाणार आहे. सध्याची वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन फक्त दिवसा चालते. पण अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन ही दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेत चालवता येणार आहे. या गाडीत 12 स्लीपर आणि आठ अनरिझर्व कोच राहणार आहेत.

तसेच दोन कोच लगेजसाठी राहणार आहेत. या ट्रेनमध्ये जवळपास एक हजार आठशे प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. अशा परिस्थितीत या गाडीचे तिकीट दर किती राहणार हा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की देशातील सर्वसामान्यांना लक्षात ठेवून सुरू होणारी ही अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन सर्वसामान्यांना परवडणार आहे. या गाडीचे तिकीट दर वंदे भारत एक्सप्रेस पेक्षा कमी राहतील आणि प्रवाशांना वंदे भारत एक्सप्रेस सारखाच अनुभव घेता येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन चे तिकीट दर हे सर्वसामान्य एक्सप्रेस ट्रेन पेक्षा पंधरा टक्के अधिक राहणार आहेत. ही गाडी राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेसच्या धरतीवर चालवली जाणार असून या गाडीचा कमाल वेग हा 130 किलोमीटर प्रतितास एवढा राहणार आहे.

यामध्ये सुरू करा आणि जनरल श्रेणीचे कोच राहणार आहेत. या गाडीचा कलर केशरी आणि राखाडी रंगाचा राहणार आहे. या गाडीचे इंजन वंदे भारत एक्सप्रेस सारखेच राहील पण ही गाडी नॉन एसी राहणार आहे. सध्याची वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण एसी गाडी आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा