Vande Bharat Sleeper Train : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. यामुळे भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी नेहमीच वेगवेगळे निर्णय घेत असते. प्रवाशांचा प्रवास जलद आणि आरामदायी व्हावा यासाठी रेल्वे नेहमीच प्रयत्नशील असते. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून 2019 मध्ये वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात आली.
वंदे भारत एक्सप्रेस सुरुवातीला नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर धावली. यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. विशेष म्हणजे या 51 पैकी आठ मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत.
यामुळे महाराष्ट्रासहित संपूर्ण देशातील प्रवाशांचा प्रवास हा जलद झाला आहे. प्रवाशांच्या माध्यमातून वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला खूपच चांगला प्रतिसाद दाखवला जात आहे. यामुळे गदगद झालेल्या रेल्वेच्या माध्यमातून आता वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवली जाणार आहे.
दरम्यान, याच स्लीपर ट्रेन संदर्भात आताची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. ही गाडी नेमकी कधी सुरू होणार, या गाडीची ट्रायल रन कधी घेतली जाणार? यासंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
कधी सुरू होणार ट्रायल रन
मिळालेल्या माहितीनुसार ही गाडी सुरुवातीच्या टप्प्यात 130 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणार आहे. नंतर मात्र या गाडीचा वेग वाढेल आणि ती 160 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यास सक्षम होईल.
वंदे भारत स्लीपर ट्रेनला 16 कोचं राहणार आहेत. या गाडीची ट्रायल रन ऑगस्ट महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे. 15 ऑगस्टला वंदे भारत स्लीपर ट्रेनची ट्रायल सुरू होऊ शकते असा दावा मेडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे.
सुरुवातीला कोणत्या मार्गावर धावणार
देशातील पहिली वंदे भारत ट्रेन आपल्या महाराष्ट्राला मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीला ही ट्रेन दिल्ली ते कोलकत्ता किंवा दिल्ली ते मुंबई या मार्गावर चालवली जाऊ शकते असा दावा होत आहे. यामुळे महाराष्ट्राला पहिली वंदे भारत स्लीपर मिळणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.
केव्हा धावणार?
या गाडीची ऑगस्टपासून ट्रायल रन सुरू होईल आणि या वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजेच डिसेंबर 2024 अखेरपर्यंत ही गाडी वाहतुकीसाठी सुरू होण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या टप्प्यात दोन वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होतील आणि यानंतर मग टप्प्याटप्प्याने या गाड्यांची संख्या वाढेल असे म्हटले जात आहे.
तिकीट दर किती असणार
मीडिया रिपोर्टनुसार सध्या सुरू असणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांपेक्षा या गाडीचे तिकीट दर थोडेसे अधिक राहणार आहे. राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेसच्या तुलनेत वंदे भारत स्लीपर ट्रेन चे तिकीट दर दहा ते पंधरा टक्के अधिक राहू शकते.