Vande Bharat Sleeper Express Train : 2019 मध्ये भारतीय रेल्वेच्या ताफ्यात वंदे भारत एक्सप्रेस ही ट्रेन सामील झाली. तेव्हापासून देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले आहे. सर्वप्रथम ही गाडी देशातील नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर सुरू झाली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे ज्या मार्गांवर ही गाडी सुरू झाली आहे तेथे रेल्वे प्रवाशांच्या माध्यमातून या गाडीला विशेष प्रतिसाद देखील दाखवला जात असून यामुळे रेल्वेला चांगले उत्पन्न मिळत आहे.
दरम्यान याच वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. ते म्हणजे आता या गाडीचे स्लीपर वर्जन देखील रुळावर येण्याची शक्यता आहे.
खरेतर या गाडीच्या स्लीपर वर्जनची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. आता मात्र लवकरच ही गाडी रुळावर धावणार आणि यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास गतिमान होणार अशी आशा आहे.
सध्या सुरू असलेली एसी वंदे भारत एक्सप्रेस ही फक्त चेअर कार आसन व्यवस्था प्रकारातील आहे. यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असेल तर ही गाडी उपयुक्त पडणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.
यामुळे ही गाडी रात्रीच्या वेळेस देखील चालवली जात नाहीये. परिणामी, वंदे भारत एक्सप्रेस स्लीपर ट्रेन सुरू करण्याचा निर्णय रेल्वेने घेतलेला असून याच ट्रेन संदर्भात आता मोठी माहिती हाती आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वंदे भारत स्लीपर ट्रेन आता सप्टेंबर 2024 मध्ये रुळावर धावू शकते. विशेष म्हणजे या गाडीचा वेग 130 किलोमीटर प्रति तास एवढा राहील असा अंदाज आहे. येत्या 100 दिवसात ही गाडी रुळावर येण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.
या गाडीमुळे लांब पल्ल्याचा प्रवास देखील सोयीस्कर होणार आहे. सध्या ज्या लांब पल्ल्याच्या मार्गावर राजधानी एक्सप्रेस धावत आहे त्या ठिकाणी वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस ट्रेन चालवली जाईल अशी शक्यता व्यक्त होत आहे.
वंदे भारत एक्स्प्रेसच्या स्लीपर वर्जनमध्ये 16 डबे राहणार आहेत. यात राजधानीप्रमाणेच थर्ड एसी, सेकंड एसी आणि फर्स्ट एसी कोच उपलब्ध राहणार अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून समोर आली आहे.
या गाडीच्या बर्थ, एअर डक्ट, केबल डक्ट, वॉशरूमचे डिझाइनही राजधानीपेक्षा वेगळे राहणार आहे. या गाडीमुळे प्रवाशांना आरामदायी आणि जलद प्रवास अनुभवता येणार आहे.