Vande Bharat Metro News : वंदे भारत एक्सप्रेस च्या अभूतपूर्व यशानंतर आता लवकरच देशात वंदे भारत मेट्रो सुरु होणार आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या माध्यमातून आता प्रयत्न सुरू झाले आहेत. या संदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी देखील एक मोठी अपडेट दिली आहे.
वैष्णव यांनी डिसेंबर 2023 पर्यंत वंदे भारत मेट्रो रुळावर धावतील अशी माहिती नुकतीच एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टला दिली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ही वंदे भारत मेट्रो 100 किलोमीटर अंतरावर वसलेल्या दोन शहरांना कनेक्ट करण्याचे काम करणार आहे.
यामुळे एका शहरातून दुसऱ्या शहरात रोजाना कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांचा मोठा फायदा होणार आहे. विशेषता विद्यार्थ्यांना या ट्रेनचा सर्वाधिक लाभ होणार आहे. खरं पाहता वंदे भारत एक्सप्रेस 180 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यास सक्षम आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी गोड बातमी ! ‘हा’ मेट्रो मार्ग प्रकल्प आता लवकरच होणार पूर्ण; सिडको उभारणार प्रकल्प, शासनाचा हिरवा कंदील
परंतु रेल्वे कोर्टाने या ट्रेनला 130 किलोमीटर प्रतितास या वेगात धावण्यास परवानगी दिली आहे. असे असले तरी ही ट्रेन प्रत्यक्षात 100 ते 110 किलोमीटर प्रतितास या वेगात धावत आहे. काही मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस याहीपेक्षा कमी गतीने धावत आहे.
दरम्यान वंदे भारत मेट्रो ही नवीन मेट्रो ट्रेन ११० किलोमीटर प्रतितास या वेगाने धावेल असा आशावाद जाणकार लोकांनी व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही वंदे भारत मेट्रो उत्तर प्रदेश राज्यातील लखनऊ ते कानपूर आणि लखनऊ ते सीतापुर दरम्यान लवकरच सुरू होणार आहे.
आपल्याही राज्यातील 100 किलोमीटरच्या आत वसलेल्या शहरांना कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी ही गाडी सुरू केली जाणार आहे. दरम्यान आज आपण लखनऊ ते कानपूर आणि सीतापूर दरम्यान सुरू होणाऱ्या वंदे भारत मेट्रो बाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- पंजाब डख यांचा 29 एप्रिलचा हवामान अंदाज : ‘या’ जिल्ह्यात पडणार अतिमुसळधार पाऊस, काही भागात गारपीट पण होणार, पहा….
लखनऊ कानपूर वंदे भारत मेट्रो बाबत थोडक्यात
एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, लखनऊ आणि कानपूर या दोन शहरांना वंदे भारत मेट्रोची कनेक्टिव्हिटी लवकरच मिळणार आहे. लखनौ ते कानपूर दरम्यान वंदे भारत मेट्रो ट्रेनमध्ये अमौसी, उन्नाव, अजगाई सारखी अनेक स्थानके तयार केली जाऊ शकतात. वंदे भारत मेट्रो ट्रेनमुळे या मोठ्या शहरांमध्ये रोज कामासाठी प्रवास करणार्यांचा प्रवास खूप सोपा होणार आहे.
रॅपिड रेल्वेप्रमाणे वंदे भारत मेट्रो ट्रेनचे भाडे 1 ते 2 रुपये प्रति किलोमीटर असू शकते अशी देखील माहिती देण्यात आली आहे. या ट्रेनमुळे या दोन्ही शहरांदरम्यानचा प्रवास मात्र 30 ते 45 मिनिटात होणार आहे. अर्थातच या ट्रेनमुळे जलद कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
यासोबतच लखनऊ ते सीतापुर दरम्यान देखील वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरू होणार आहे. या दोन्ही शहरा दरम्यान 89 किलोमीटरचे अंतर असून सध्या स्थितीला उपलब्ध असलेल्या रेल्वेने प्रवास केल्यास दोन तासांचा कालावधी लागतो. मात्र लखनऊ ते सीतापुर वंदे भारत मेट्रो ने हा प्रवास 50 मिनिटात पूर्ण करता येणार आहे.
हे पण वाचा :- काय सांगता ! आता महाराष्ट्रात तलाठी राहणार नाही; तलाठी पद रिक्त करण्यासंदर्भात कृषीमंत्र्यांनी दिले मोठे संकेत