Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आपल्या आकर्षक लूकमुळे आणि जलद सेवेमुळे चांगलीच लोकप्रिय झाली आहे. ही गाडी रेल्वेच्या ताफ्यात 2019 पासून दाखल झाली आहे. सर्वप्रथम नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर ही गाडी सुरू झाली. यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतरही महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू झाली.
या गाडीची लोकप्रियता पाहता आता ही गाडी इतरही अन्य महत्वाच्या मार्गांवर चालवण्याचा प्लॅन आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, 30 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
यामध्ये मुंबई ते जालना या वंदे भारत ट्रेनचा देखील समावेश आहे. ही गाडी छत्रपती संभाजी नगर मार्गे चालवली जाणार आहे. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना दरम्यान चालवली जाणार आहे.
विशेष म्हणजे नुकतेच या गाडीचे प्रस्तावित वेळापत्रक देखील समोर आले आहे. निश्चितच गाडी सुरू झाल्यास मुंबई ते जालना हा प्रवास वेगवान होणार आहे.
पण या गाडीमुळे मुंबईकरांची डोकेदुखी देखील वाढण्याची शक्यता आहे. ही गाडी सुरू झाल्यानंतर मुंबईतील अनेक रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
शिवाय लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई ते जालना या वंदे भारत ट्रेन मुळे 13 रेल्वे गाड्या आणि 7 लोकलच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होणार आहे.
त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास विलंबाने होणार अशी शक्यता आहे. एकंदरीत मुंबई ते जालना या वंदे भारत ट्रेनमुळे मराठवाड्यातील नागरिकांना दिलासा मिळणार असला तरी देखील यामुळे मुंबईकरांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान आता आपण मुंबई ते जालना या वंदे भारत एक्सप्रेस चे वेळापत्रक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक ?
मिळालेल्या माहितीनुसार ही वंदे भारत एक्सप्रेस जालना येथून पहाटे पाच वाजून पाच मिनिटांनी परवाना होणार आहे आणि दुपारी अकरा वाजून 55 मिनिटांनी मुंबईत पोहोचणार आहे.
तसेच ही गाडी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी रवाना होणार आहे आणि जालना येथे रात्री साडेआठ वाजता पोहोचणार आहे.