मोठी बातमी ! ‘या’ मार्गावर सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस, ‘ही’ दोन शहरे जोडली जाणार; वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vande Bharat Express : गेल्या काही वर्षांत भारतात रेल्वे प्रवाशांमध्ये वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची आणि मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत तयार झालेली पहिली हाय स्पीड ट्रेन विशेष लोकप्रिय बनली आहे. ही गाडी नेहमीच चर्चेत राहते.

या गाडीमध्ये देण्यात आलेल्या वर्ल्डक्लास सोयी-सुविधा आणि गाडीचा अधिकचा वेग यामुळे ही गाडी अल्पकालावधीत प्रवाशांमध्ये लोकप्रिय बनली आहे. या गाडीमुळे प्रवाशांचा प्रवास जलद आणि आरामदायी झाला आहे.

विशेष बाब अशी की, रेल्वे प्रवाशांच्या माध्यमातून ही गाडी वेगवेगळ्या मार्गावर सुरू करण्यासाठी जोरदार मागणी केली जात आहे. हेच कारण आहे की भारतीय रेल्वे देखील विविध मार्गांवर या गाडीचे संचालन सुरु करू पाहत आहे.

आतापर्यंत देशातील 34 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू झाली आहे. तसेच मार्च 2024 पर्यंत देशातील 75 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू करण्याचे नियोजन भारतीय रेल्वेने आखले आहे. अशातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, देशातील आणखी एका महत्त्वाच्या मार्गावर या गाडीचे संचालन सुरू होणार आहे. राजस्थान येथील जयपूर ते गुजरात मधील अहमदाबाद किंवा जयपूर ते इंदोर या मार्गावर ही गाडी सुरू होणार असा दावा केला जात आहे.

अजून रेल्वे बोर्डाने कोणत्या मार्गावर ही गाडी धावणार हे ठरवलेले नाही मात्र वंदे भारत एक्सप्रेसचा नवीन रेक जयपूर येथे पोहोचला आहे. यामुळे पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुका पूर्ण झाल्यानंतर या गाडीचे संचालन सुरू होणार अशी माहिती समोर येत आहे.

म्हणजे राजस्थानला लवकरच चौथ्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. पण ही वंदे भारत एक्सप्रेस जयपुर ते अहमदाबाद की जयपूर ते इंदूर कोणत्या मार्गावर धावणार याबाबत अजून रेल्वे विभागाकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मात्र ही गाडी या दोन पैकी कोणत्यातरी एक मार्गावर चालवण्याचे नियोजन आहे. यामुळे आता ही गाडी कोणत्या मार्गावर धावते हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्राला देखील आणखी काही वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असे वृत्त समोर आले होते. राज्यातील मुंबई ते छत्रपती संभाजी नगर आणि पुणे ते सिकंदराबाद या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असा दावा केला जात आहे.

याशिवाय पुणे ते वडोदरा आणि मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर देखील नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असे वृत्त समोर आले होते. एकंदरीत सध्या राज्यातुन सहा वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत, पण आगामी काही महिन्यांमध्ये वंदे भारत एक्सप्रेसची ही संख्या आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा