आनंदाची बातमी ! देशातील ‘या’ महत्त्वाच्या मार्गावर सुरू होणार वंदे भारत ट्रेन, कसा राहणार रूटमॅप, वाचा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vande Bharat Express : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या ही सर्वाधिक आहे. स्वस्तात आणि जलद गतीने रेल्वेचा प्रवास होत असल्याने या प्रवासाला पसंती दाखवली जात आहे. रेल्वेने प्रवास करण्याची अनेक कारणे आहेत त्यापैकी एक म्हणजे भारतीय रेल्वेचे जाळे हे देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. यामुळे एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी रेल्वेचाच वापर सर्वात जास्त केला जातो.

दरम्यान 2019 मध्ये देशभरातील रेल्वे प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता यावा यासाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली. तेव्हापासून रेल्वे प्रवाशांच्या संख्येत आणखीनच वाढ झाली आहे. ही गाडी रेल्वेच्या ताफ्यात सामील झाल्यापासून या गाडीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता या गाडीनेच प्रवास करण्यास प्रवाशांनी पसंती दाखवली आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

हेच कारण आहे की, भारतीय रेल्वे देखील देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे मार्गावर ही गाडी सुरू करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे भारतीय रेल्वे वाराणसी ते लखनऊ दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू करणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, नुकत्याच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोरखपूर ते लखनऊ दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे.

आता उत्तर प्रदेश राज्याला आणखी एक वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. वाराणसी ते लखनऊ यादरम्यान सुरू होणारी ही गाडी अयोध्या मार्गे धावणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. सध्या यासाठी भारतीय रेल्वेच्या माध्यमातून आवश्यक पूर्वतयारी केली जात आहे. याचा आराखडा अद्याप तयार झालेला नसून आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

वास्तविक, राममंदिर पुढील वर्षी भाविकांसाठी खुले केले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात भव्य राम मंदिर रामभक्तांसाठी खुले होणार आहे. जानेवारीत जवळपास दहा दिवस प्रभू श्री रामजींच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित केला जाणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्ण झाल्यानंतर मग हे भव्य मंदिर रामभक्तांना दर्शनासाठी खुले होणार आहे.

अशा परिस्थितीत काशी, वाराणसी म्हणजे भोले बाबाची नगरीं आणि मर्यादापुरुषोत्तम भगवान श्री राम जी यांची नगरी अयोध्या यांना जोडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, जेणेकरून लोकांना राम मंदिराच्या दर्शनासोबतच वाराणसीला जाण्यासाठीही कोणतीही अडचण येऊ नये. लखनौ ते वाराणसी या गाड्या सध्या बहुतेक रायबरेली मार्गे जातात.

यामुळे अयोध्या सुटते. हे लक्षात घेऊन आता वाराणसी ते लखनऊ दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जाणार असून ही गाडी आहे अयोध्यामार्गे चालवण्याचा प्लॅन सरकारचा आहे. सध्या याचा आराखडा तयार केला जात आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी या प्रस्तावावर सध्या चर्चा सुरू असल्याची माहिती देखील दिली आहे. निश्चितच ही गाडी तर सुरू झाली तर काशीला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना भगवान श्रीरामांचे देखील दर्शन सुलभतेने घेता येणे शक्य होणार आहे.