आता वंदे भारत एक्सप्रेस रात्रीही धावणार ! ‘या’ मार्गावर सुरू झाली देशातील पहिली Overnight वंदे भारत, कसाय रूट?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vande Bharat Express : गेल्या काही वर्षांपासून वंदे भारत एक्सप्रेसच्या विशेष चर्चा पाहायला मिळत आहेत. ही देशातील पहिली मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत तयार झालेली हाय स्पीड ट्रेन आहे. या गाडीची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. सुरुवातीला ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवण्यात आली.

या मार्गावरील प्रवाशांनी या गाडीला विशेष प्रतिसाद दाखवला. प्रवाशांच्या अभूतपूर्व अशा प्रतिसादामुळे भारतीय रेल्वेने मग टप्प्याटप्प्याने देशातील इतरही अन्य महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला सुरू करण्याचा निर्णय घेतला. सध्या स्थितीला देशातील एकूण 34 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी धावत आहे.

यापैकी सहा वंदे भारत गाड्या महाराष्ट्राला मिळाल्या आहेत. राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस चे साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, नागपूर ते बिलासपुर आणि इंदोर ते नागपूर या सहा मार्गांवर ही गाडी धावत आहे.

तसेच महाराष्ट्राला आणखी काही वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. राज्यातील मुंबई ते कोल्हापूर, मुंबई ते जालना, पूणे ते सिकंदराबाद, पुणे ते वडोदरा, मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर ही गाडी सुरू होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.

येत्या काही वर्षात महाराष्ट्रासहित इतरही राज्यांना या गाडीचा लाभ मिळणार आहे. मार्च 2024 पर्यंत देशातील 75 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला सुरू केले जाणार आहे. यामुळे निश्चितच भारतातील रेल्वे प्रवास आणखी जलद आणि सुरक्षित असा विश्वास व्यक्त होत आहे.

अशातच मात्र वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वंदे भारत एक्सप्रेस आता रात्रीच्या वेळी सुद्धा चालणार आहे. भारतातील पहिल्या सेमी-हायस्पीड वंदे भारत एक्सप्रेसची पहिली Overnight सेवा सुरू झाली आहे.

बंगळुरू ते चेन्नई दरम्यान ही सेवा सुरू करण्यात आली आहे. यामुळे या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास आणखी गतिमान झाला आहे. आता रात्रीच्या वेळी या ट्रेनने प्रवास करता येत असल्याने नागरिकांना अधिक वेगाने एका शहरातून दुसऱ्या शहरात पोहोचता येत आहे.

सणासुदीच्या काळात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन Overnight वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आली असल्याचे वृत्त समोर आले आहे. चेन्नई सेंट्रल आणि यशवंतपूर बेंगळुरू दरम्यान Overnight वंदे भारत एक्सप्रेस 21 नोव्हेंबर 2023 पासून सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चेन्नई सेंट्रल ते म्हैसूर या मार्गावर ही ओव्हरनाईट सेवा सुरू झाली आहे. या मार्गावरील ही गाडी बेंगलोरमार्गे धावणार आहे. ही गाडी आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. ही गाडी बुधवार वगळता संपूर्ण आठवडाभर धावणार आहे.

खरे तर, आत्तापर्यंत धावणाऱ्या सर्व ३४ वंदे भारत एक्सप्रेस फक्त दिवसा चालवल्या जात होत्या. मात्र सणासुदीच्या काळात प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन दक्षिण रेल्वेने रात्रीच्या वेळी वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे चेन्नई ते मैसूर दरम्यान धावणारी ही देशातील पहिली ओव्हरनाईट वंदे भारत एक्सप्रेस बनली आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा