आता विमानाचा प्रवास विसराल; रेल्वे ‘या’ 6 मार्गावर सुरु करणार विमानापेक्षा भारी वंदे भारत ट्रेन, कसा राहणार रूट ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vande Bharat Express : गेल्या काही वर्षांमध्ये वंदे भारत एक्सप्रेस बाबत विशेष चर्चा पाहायला मिळत आहेत. कधी या गाडीच्या अत्याधुनिक सोयीसुविधा तर कधी या गाडीचे महागडे तिकीट दर यांसारख्या कारणांमुळे ही गाडी नेहमीच चर्चेत राहिली आहे. विशेष म्हणजे 2019 मध्ये म्हणजेच अवघ्या चार वर्षांच्या काळात ही गाडी देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये सुरू झाली आहे.

सर्वात आधी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर या गाडीचे संचालन सुरू झाले होते. यानंतर टप्प्याटप्प्याने भारतीय रेल्वेने या गाडीचा विस्तार करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत देशातील जवळपास 34 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला सुरू करण्यात आले आहे.

ज्या ठिकाणी ही गाडी सुरू आहे तेथील रेल्वे प्रवाशांनी या गाडीला अभूतपूर्व असा प्रतिसाद दाखवला आहे. यामुळे रेल्वेला चांगला नफा मिळत आहे. या गाडीमुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक गतिमान आणि सुरक्षित झाला आहे, प्रवाशांचा प्रवास आरामदायी झाला आहे. त्यामुळे या गाडीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. सर्वत्र या गाडीची मागणी देखील केली जातेय.

लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून त्यांच्या मतदार संघात देखील ही गाडी धावली पाहिजे यासाठी पाठपुरावा केला जातोय. वेगवेगळ्या भागातील रेल्वे प्रवाशांनी देखील ही गाडी सुरू करण्यासाठी मागणी केली आहे. हेच कारण आहे की आता भारतीय रेल्वे मार्च 2024 पर्यंत जवळपास 75 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला सुरू करू शकते असा दावा केला जात आहे.

सध्या आपल्या राज्यातुन सहा वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. मात्र आगामी काही महिन्यांमध्ये आणखी काही वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार हे नक्की आहे. यामुळे राज्यातील धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसची संख्या लवकरच वाढेल असा अंदाज आहे.

अशातच मात्र भारतीय रेल्वेने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. ज्याप्रमाणे विमानाचा प्रवास आहे तसाच काहीसा प्रवास आता वंदे भारतने देखील करता येणार आहे. आता विमान प्रवाशांसारख्याच सुविधा वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवाशांना मिळणार आहेत.

विमानामध्ये ज्या प्रमुख सुविधा दिल्या जात आहेत तशाच सुविधा आता वंदे भारत एक्सप्रेस मध्ये दिल्या जाणार असून यासाठी एक विशेष प्रोजेक्ट हाती घेण्यात आला आहे. या पायलट प्रोजेक्ट अंतर्गत सुरुवातीच्या टप्प्यात देशातील सहा महत्त्वाच्या रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस मध्ये या हायटेक सुविधा दिल्या जाणार आहेत.

काय काय सुविधा मिळणार?

मीडिया रिपोर्ट नुसार, प्रवाशांचा प्रवास आधीच्या तुलनेत अधिक आरामदायी, सोपा आणि जलद बनवण्यासाठी आता वंदे भारत मध्ये विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये प्रवाशांना खाण्यापिण्याचे अनेक पर्याय मिळणार आहेत. प्रवाशांना कॅब सर्विस दिली जाणार आहे. दिव्यांग प्रवाशांसाठी व्हीलचेअर ची सुविधा राहणार आहे.

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये आता विमानाप्रमाणेच प्रवाशांना त्यांचा आवडता चित्रपट किंवा इतर कार्यक्रम पाहता येणार आहेत. आता वंदे भारतच्या प्रत्येक डब्यात हाउसकीपिंगचा एक स्टाफ राहणार आहे. आता प्रवाशांना तिकीट बुक करताना जेवणाची ऑर्डर देता येणार आहे. ही सुविधा सुरुवातीला देशातील सहा महत्त्वाच्या रेल्वे मार्गावर पुरवली जाणार आहे.

कोणत्या मार्गावर उपलब्ध होणार नवीन सुविधा ?

रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, चेन्नई-म्हैसूर रूट, चेन्नई-तिरुनलवेली, चेन्नई-कोयंबट्टूरर, तिरुवनंतपूरम-कासरगोड, चेन्नई-विजयवाडा या दक्षिण रेल्वे विभागाच्या महत्त्वाच्या रेल्वे मार्गावर सुरुवातीच्या टप्प्यात या सुविधा पुरवल्या जाणार आहेत. वास्तविक सुरवातीला सहा रेल्वे मार्गावर या सुविधा दिल्या जाणार आहेत. पण सध्या फक्त पाच मार्गचं अंतिम झाले आहेत. सहावा मार्ग निश्चित होणे अजून बाकी आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा