Vande Bharat Express : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे महाराष्ट्राला दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. सध्या देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. यापैकी आठ गाड्या आपल्या महाराष्ट्रालाच मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे आगामी काळात आणखी दोन वंदे भारत एक्सप्रेस महाराष्ट्राला मिळणार आहेत.
यामुळे ही संख्या 10 वर पोहोचणार आहे. एवढेच नाही तर महाराष्ट्राला देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेनची देखील भेट मिळणार आहे. ही गाडी मुंबई ते सिकंदराबाद या मार्गावर चालवली जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त समोर आले आहे.
आधी ही गाडी पुणे ते सिकंदराबाद या मार्गावर चालवली जाणार असे म्हटले जात होते. मात्र देशातील पहिली स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस मुंबई ते सिकंदराबाद या मार्गावर चालवली जाणार असा दावा होऊ लागला आहे.
नक्कीच ही मुंबईकरांसाठी एक मोठी आनंदाची वार्ता ठरणार आहे. दुसरीकडे महाराष्ट्राला दोन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन देखील मिळणार आहेत. या गाड्या मुंबई आणि पुण्याला मिळणार आहेत.
कोणत्या मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान कोल्हापुरात प्रचाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी पंतप्रधान महोदय यांनी कोल्हापूरला लवकरच वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असे म्हटले होते.
यानंतर तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर लोकसभा निवडणुकीनंतर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे अशी माहिती दिली होती.
यामुळे मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर ही गाडी सुरू होणार हे जवळपास नक्की आहे. याशिवाय पुणे ते सिकंदराबाद या मार्गावर देखील वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार असा दावा होऊ लागला आहे.
आधी या मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवली जाणार असे सांगितले जात होते. मात्र आता या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू होणार असल्याची बातमी समोर आली आहे.
निश्चितच ही ट्रेन सुरू झाल्यास पुणे ते सिकंदराबाद हा प्रवास जलद होणार असून या निमित्ताने थेट पुणे रेल्वे स्थानकावरून पहिली-वहिली वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. यामुळे नक्कीच मुंबई आणि पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.