महाराष्ट्राला मिळणार आणखी एका वंदे भारत एक्सप्रेसची भेट ! कोणत्या मार्गावर धावणार, केव्हा सुरू होणार ? रेल्वेने स्पष्टच सांगितले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vande Bharat Express : आगामी वर्षात म्हणजेच 2024 मध्ये सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांचा थरार रंगणार आहे. यामुळे गेल्या चार वर्षात पहिल्यांदाच देशभरातील वेगवेगळ्या विकास कामांना अपेक्षित अशी गती देण्यात आली आहे. सर्वत्र अगदी वायु वेगाने विकास कामांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

यामध्ये वेगवेगळी रस्ते विकासाची प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. समाजातील सर्वच घटकांना खुश करण्याचा प्रयत्न शासनाने सुरू केला आहे. देशातील नागरिकांसाठी शासनाकडून विविध योजना सुरू केल्या जात आहेत.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अशातच आता महाराष्ट्रातील नागरिकांना लवकरच आणखी एक वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वे लवकरच राज्यातील कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करणार आहे. खरंतर ही एक्सप्रेस ट्रेन 2019 मध्ये पहिल्यांदा सुरू झाली होती.

ज्यावेळी ही गाडी सुरू झाली तेव्हा कोणालाच ही गाडी एवढ्या लवकर रेल्वे प्रवाशांमध्ये लोकप्रिय होईल असे वाटतं नव्हते. मात्र अल्पावधीतच ही गाडी प्रवाशांच्या पसंतीस खरी उतरली. रेल्वे प्रवाशांच्या माध्यमातून आता वेगवेगळ्या मार्गावर या गाडीला सुरू करण्याची मागणी केली जात आहे.

यामध्ये मुंबई ते कोल्हापूर दरम्यान देखील ही गाडी सुरू करण्याची मागणी होती. याच पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेच्या माध्यमातून आता मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराष्ट्र टर्मिनस यादरम्यान ही गाडी सुरू केली जाणार आहे.

निश्चितच या मार्गावर ही गाडी सुरू झाली तर मुंबई ते कोल्हापूर हा प्रवास गतिमान होणार आहे. सध्यास्थितीला मुंबईहून कोल्हापूर आणि कोल्हापूरहून मुंबई हा प्रवास करण्यासाठी नागरिकांना रेल्वे मार्गाने जवळपास दहा ते बारा तासांचा कालावधी खर्च करावा लागत आहे. विशेष म्हणजे या मार्गावर केवळ एकच रेल्वे सुरू आहे.

तसेच या मार्गावर बसने प्रवास केल्यास आठ ते नऊ तासात प्रवास पूर्ण होतो. यामुळे रेल्वेचा प्रवास नागरिकांसाठी फायदेशीर ठरत नाहीये. पण या मार्गावर जर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली तर बारा तासांचा प्रवास मात्र सात तासात पूर्ण होईल असा दावा केला जात आहे. याचाच अर्थ ही गाडी सुरू झाली तर रेल्वे प्रवासात जवळपास पाच तासांची बचत होणार आहे.

केव्हा सुरू होणार मुंबई कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस

मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार हे जवळपास नक्की झाले आहे. यामुळे मुंबई येथील करवीर निवासिनी अंबाबाई मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना वेगाने कोल्हापूरला पोहोचता येणार आहे.

तसेच कोल्हापूर येथून राजधानी मुंबईला जाणाऱ्या नागरिकांना देखील जलद गतीने प्रवास करता येणार आहे. यामुळे ही गाडी दोन्ही शहरांच्या दृष्टिकोनातून फायदेशीर राहणार आहे. यामुळे नागरिकांचा मोठा फायदा होणार असून त्यांचा प्रवास गतिमान होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या वंदे भारत एक्सप्रेसला या मार्गावरील दादर, ठाणे, कल्याण, पुणे, सातारा आणि मिरज जंक्शन अशा महत्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाणार आहे. मात्र ही गाडी केव्हा सुरू होणार याबाबत अद्याप कोणतीच अधिकारीक माहिती हाती आलेली नाही.

परंतु रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, ज्यावेळी या रेल्वे मार्गाची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील त्यावेळी ही गाडी सुरू होईल. खरंतर सध्या मुंबई कोल्हापूर रेल्वे मार्गावर 110 किलोमीटर प्रति तास या वेगाने रेल्वे धावत आहे. परंतु वंदे भारत एक्सप्रेसचा ताशी स्पीड 160 किलोमीटर प्रति तास एवढा आहे.

यामुळे ही गाडी सुरू करण्यासाठी या मार्गाच्या रुळांचे अपग्रेडेशन करावे लागणार आहे. यामुळे या तांत्रिक कामांसाठी मार्च 2024 पर्यंतचा कालावधी लागणार आणि म्हणूनच मार्च 2024 नंतरच ही गाडी सुरू होणार अशी माहिती काही मीडिया रिपोर्ट मधून समोर येत आहे.