वंदे भारत एक्सप्रेस इमर्जन्सीमध्ये चेन ओढून थांबवता येते का ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vande Bharat Express Info In Marathi : देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. कमी वेळेत आणि कमी खर्चात रेल्वेचा प्रवास होतो म्हणून सर्वसामान्य लोक रेल्वेला अधिक पसंती दाखवतात. शिवाय रेल्वेचे जाळे हे खूप विस्तारलेले आहे. रेल्वेतून देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यातून कोणत्याही भागात सहजतेने जाता येते. शिवाय रेल्वेचा प्रवास हा सुरक्षित आणि गतिमान आहे.

यामुळे नेहमीच प्रवासासाठी रेल्वेला पहिली पसंती मिळते. गरीब-श्रीमंत, लहान-मोठे, स्त्री पुरुष सर्वच जण रेल्वेने प्रवास करण्यास पसंती दाखवतात. विशेष बाब म्हणजे वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाल्यापासून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. वंदे भारत एक्सप्रेस ने प्रवास करणे अनेकांना आवडू लागले आहे. या गाडीची लोकप्रियता कमी वेळेतच खूपच वाढली आहे.

अल्पावधीत ही गाडी राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेसच्या तुलनेत लोकप्रिय बनली आहे. या गाडीचे भाडे जरूर अधिक आहे मात्र या गाडीमधील सोयीसुविधा आणि सुरक्षित तसेच गतिमान प्रवास या गाडीची लोकप्रियता वाढवत आहे. मात्र असे असले तरी अनेकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये म्हणजेच इमर्जन्सी मध्ये ही गाडी कशी थांबवायची याबाबत कदाचित माहिती नसेल.

खरतर साध्या रेल्वेमध्ये आपातकालीन परिस्थितीमध्ये गाडी थांबवण्यासाठी चेन ओढण्याचा पर्याय उपलब्ध असतो. म्हणजेच साध्या गाडीमध्ये चेन पुलिंग सिस्टम असते. मात्र वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये ही सिस्टम नाहीये. आता ही वंदे भारत एक्सप्रेस चेन ओढून थांबवता येत नाही मग आपातकालीन परिस्थितीमध्ये ही गाडी कशी थांबते ? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. दरम्यान आज आपण याच प्रश्नाचे उत्तर थोडक्यात जाणून घेणार आहोत.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, 2019 मध्ये सुरू झालेली ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन अत्याधुनिक आहे. या ट्रेनमध्ये चेन पुलिंग सिस्टम नाही. मात्र एमर्जेंसी मध्ये ही गाडी थांबवण्यासाठी एक विशिष्ट यंत्रणा या गाडीत देण्यात आली आहे. या गाडीत अलार्म सिस्टम बसवण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रवासी अलार्म दाबून ही गाडी थांबवू शकतात.

एखाद्या प्रवाशाने अलार्म वाजवल्यास त्या प्रवाशाचा चेहरा ट्रेनच्या लोको पायलटला दिसेल यानंतर ऑडिओच्या माध्यमातून लोको पायलट आणि संबंधित प्रवासी एकमेकांशी कनेक्ट होतील. लोको पायलट संबंधित प्रवाशाला गाडी थांबवण्याचे कारण विचारेल. जर प्रवाशाचे कारण योग्य असेल आणि गाडी थांबवणे आवश्यक असेल तर लोको पायलट गाडी थांबवेल.

मात्र जर विनाकारण अलार्म दाबला तर अशा प्रवाशांवर कडक कारवाई केली जाईल. विशेष म्हणजे वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रत्येक बोगीत टॉक बटनही लावण्यात आले आहे. टॉक बटनच्या माध्यमातून देखील प्रवासी लोको पायलटशी जोडले जातात. या टॉक बटनचा वापर करून प्रवासी लोको पायलटकडे आपातकालीन परिस्थितीमध्ये मदत मागू शकतो.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा