मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, शेगावला मिळणार वंदे भारत एक्सप्रेस ! ‘या’ 4 मार्गांवर धावणार हायस्पीड ट्रेन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vande Bharat Express : सध्या स्थितीला महाराष्ट्रातून सहा वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. मात्र लवकरच हा आकडा मोठा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि संत गजानन महाराज नगरी शेगावला वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे.

महाराष्ट्राला नवीन चार वंदे भारत एक्सप्रेस दिल्या जाणार आहेत. यामुळे राज्यातील वंदे भारत एक्सप्रेसची संख्या ही 10 एवढी होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की ही हाय स्पीड ट्रेन सर्वप्रथम 2019 मध्ये सुरू झाली.

सर्वप्रथम नवी दिल्ली ते वाराणसी मार्गावर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. तेथील रेल्वे प्रवाशांनी या गाडीला अभूतपूर्व चा प्रतिसाद दाखवला. यानंतर मग टप्प्याटप्प्याने देशातील इतरही मार्गांवर या गाडीला सुरु करण्यात आले आहे.

आतापर्यंत देशातील 34 महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली आहे. विशेष म्हणजे हा आकडा येत्या काही महिन्यांमध्ये आणखी वाढणार आहे. नवीन वर्षात देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी चालवली जाणार अशी शक्यता आहे.

यामध्ये मुंबई आणि पुण्याहूनही वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. नवीन वर्षात महाराष्ट्राला चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहेत.

आता आपण या चार नवीन गाड्या कोणत्या मार्गावर चालवल्या जाऊ शकतात याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.  

कोणत्या मार्गावर सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे मार्गावरील मुंबई ते शेगाव, पुणे ते शेगाव, पुणे ते सिकंदराबाद आणि मुंबई ते संभाजीनगर या चार महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे.

ध्या स्थितीला रेल्वे बोर्डकडून मुंबई ते शेगाव आणि पुणे ते शेगाव या मार्गावर रेल्वे सुरू करण्याच्या मध्य रेल्वेच्या मागणीच्या प्रस्तावावर चर्चा केली जात आहे.

अद्याप याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही मात्र लवकरच याबाबत अंतिम निर्णय होईल आणि या दोन्ही मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्यास रेल्वे बोर्ड परवानगी देईल असे सांगितले जात आहे.

याशिवाय पुणे ते सिकंदराबाद मार्गावर सुरू असलेली शताब्दी एक्सप्रेस बंद करून त्या ऐवजी ही नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा