Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील एक संपूर्ण भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेन आहे. ही गाडी 2019 मध्ये प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे ही ट्रेन सुरू झाल्यानंतर या गाडीला अवघ्या काही वर्षातच मोठी लोकप्रियता प्राप्त झाली. ही गाडी सुरू होऊन आता पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे.
ही गाडी सुरुवातीला नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर सुरू झाली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले आहे. आतापर्यंत देशातील 41 महत्त्वाच्या मार्गांवर 82 वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. म्हणजेच या 41 रूट वरील अप आणि डाऊन मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
या गाडीची वाढती लोकप्रियता पाहता प्रवाशांच्या माध्यमातून देशातील विविध मार्गांवर ही गाडी सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. विशेष म्हणजे केंद्र शासनाच्या माध्यमातून देखील आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, 2024 मध्ये संपूर्ण भारतात 60 नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे आत्तापर्यंत 2024 मध्ये सहा मार्गांवर नवीन वंदे भारत ट्रेन सुरू झाल्या आहेत. अशा परिस्थितीत आता आपण 2024 मध्ये कोणकोणत्या मार्गांवर ही हाय स्पीड ट्रेन सुरू झाली आहे याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मुंबई-जालना वंदे भारत एक्सप्रेस : ही गाडी महाराष्ट्रातून सुरू झालेली सातवी वंदे भारत एक्सप्रेस आहे. 2 जानेवारी 2024 रोजी या मार्गावरील वंदे भारत जालना येथून सुरू झाली. मराठवाड्यातील जालना ते मुंबईला जोडणारी ही गाडी बुधवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावते.
कोइंबतूर-बेंगलोर वंदे भारत : ही गाडी एक जानेवारी 2024 पासून सुरू झाली आहे. गुरुवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस ही गाडी धावते.
अयोध्या-आनंद विहार वंदे भारत : नवी दिल्ली येथील आनंद विहार ते आयोध्या दरम्यान सुरू झालेली ही वंदे भारत एक्सप्रेस 4 जानेवारीपासून धावत आहे. बुधवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस ही गाडी धावत आहे.
नवी दिल्ली-कटरा वंदे भारत : ही गाडी 4 जानेवारी 2024 पासून सुरू झाली आहे. या गाडीमुळे नवी दिल्ली ते माता वैष्णोदेवी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. बुधवार वगळता ही गाडी आठवड्यातील सर्व दिवस धावत आहे.
अमृतसर-नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस : या गाडीचे संचालन 6 जानेवारी 2024 पासून सुरू झाले आहे. शुक्रवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस ही गाडी लावत आहे.
नागरकोइल-चेन्नई वंदे भारत एक्सप्रेस : ही गाडी 4 जानेवारी 2024 पासून सुरू झाली आहे. ही गाडी आठवड्यातून एक दिवस अर्थातच गुरुवारी धावते.