वंदे भारत एक्सप्रेस : देशात सध्या किती वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत ? महाराष्ट्रात कोणत्या मार्गावर धावतात ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vande Bharat Express : भारतात रेल्वे हे एक महत्त्वाचे साधन आहे. देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. हेच कारण आहे की, भारतीय रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुविधेसाठी विविध निर्णय घेतले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून देशात वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची ट्रेन सुरू करण्यात आली आहे.

2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारचा हा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. या अंतर्गत सुरू झालेली ट्रेन ही जवळपास शंभर कोटी रुपये खर्च करून तयार केली जाते. या गाडीचा कमाल वेग तब्बल 160 किलोमीटर प्रति तास एवढा आहे. सध्या स्थितीला ही गाडी देशातील एकूण 34 महत्त्वाच्या मार्गावर सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे ज्या मार्गांवर ही गाडी धावत आहे त्या मार्गांवरील रेल्वे प्रवाशांनी या ट्रेनला भरभरून असा प्रतिसाद दाखवला आहे. या गाडीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हेच कारण आहे की भारतीय रेल्वेच्या माध्यमातून आता देशभरातील जवळपास सर्वच महत्त्वाचे मार्गावर या गाडीला सुरू करण्याचे नियोजन आखले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार इंडियन रेल्वे मार्च 2024 पर्यंत केंद्र शासनाकडून मिळालेल्या आदेशानुसार देशभरातील एकूण 75 महत्त्वाचा मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवणार आहे. खरंतर देशात 2019 मध्ये नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर पहिल्यांदा वंदे भारत एक्सप्रेस धावली होती. रुळावर आल्यानंतर ही गाडी प्रवाशांच्या मनात घर करून गेली आहे. आतापर्यंत देशभरातील विविध मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले आहे.

आगामी काही महिन्यात आणखी काही मार्गांवर ही गाडी सुरू होणार आहे. देशातील 34 मार्गांवर ही गाडी धावत असून आपल्या महाराष्ट्राला देखील सहा वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे. दरम्यान, आज आपण देशातील कोणत्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्रातील कोणत्या मार्गावर धावते Vande Bharat Train

 • मुंबई येथील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर
 • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी
 • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर
 • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव
 • नागपूर ते बिलासपूर
 • इंदोर ते नागपूर

देशातील वंदे भारत एक्सप्रेसचे रूट ?

 • रांची-हावडा वंदे भारत एक्सप्रेस
 • जामनगर- अहमदाबाद (साबरमती) वंदे भारत एक्सप्रेस
 • उदयपूर – जयपूर वंदे भारत एक्सप्रेस
 • कासारगोड- तिरुवनंतपुरम वंदे भारत एक्सप्रेस
 • राउरकेला – पुरी वंदे भारत एक्सप्रेस
 • सिकंदराबाद (काचेगुडा) – बेंगळुरू (यशवंतपूर) वंदे भारत एक्सप्रेस
 • पाटणा-हावडा वंदे भारत एक्सप्रेस
 • MGR – चेन्नई विजयवाडा वंदे भारत एक्सप्रेस
 • तिरुनेलवेली – चेन्नई एग्मोर वंदे भारत एक्सप्रेस
 • गोरखपूर – लखनौ चारबाग वंदे भारत एक्सप्रेस
 • तिरुवनंतपुरम सेंट्रल – कासारगोड वंदे भारत एक्सप्रेस
 • सिकंदराबाद – तिरुपती वंदे भारत एक्सप्रेस
 • सिकंदराबाद- विशाखापट्टणम वंदे भारत एक्सप्रेस
 • अजमेर – दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस
 • दिल्ली-डेहराडून वंदे भारत एक्सप्रेस
 • हजरत निजामुद्दीन – राणी कमलापती वंदे भारत एक्सप्रेस
 • नवी दिल्ली – वाराणसी वंदे भारत एक्सप्रेस
 • नवी दिल्ली – श्री माता वैष्णो देवी कटरा (जम्मू आणि काश्मीर) वंदे भारत एक्सप्रेस
 • नवी दिल्ली – हिमाचल प्रदेशातील अंब अंदौरा वंदे भारत एक्सप्रेस
 • चेन्नई – कोईम्बतूर वंदे भारत एक्सप्रेस
 • चेन्नई – म्हैसूर वंदे भारत एक्सप्रेस
 • न्यू जलपाईगुडी – गुवाहाटी वंदे भारत एक्सप्रेस
 • हावडा – न्यू जलपाईगुडी वंदे भारत एक्सप्रेस
 • हावडा-पुरी वंदे भारत एक्सप्रेस
 • पटणा-रांची वंदे भारत एक्सप्रेस
 • राणी कमलापती-जबलपूर वंदे भारत एक्सप्रेस
 • केएसआर-बेंगलोर धारवाड वंदे भारत एक्सप्रेस
 • जोधपुर-साबरमती अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस 
शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा