Groundnut crop :- भुईमूग पिकाची लागवड ही मल्चिंग पेपर वर केल्यास उत्पादनात तर वाढ होणारच आहे. पण मल्चिंग पेपरचे अनेक फायदे शेतकऱ्यांना घेता येणार आहेत. तर मल्चिंग पेपरचा वापर करून भुईमूग पिकाचे लागवड केल्यास खर्च कमी होऊन नफ्यात वाढ होणार आहे.
भुईमुगाची लागवड रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात केली जाते. भुईमुगाची पेरणी फेब्रुवारी महिन्यात करण्यात येते. कारण डिसेंबर ते जानेवारी महिन्यात थंडीचे प्रमाण जास्त असते. थंडीमुळे भुईमूग लागवड करण्यास वेळ जातो.
तर मल्चिंग पेपरच्या साहाय्याने भुईमुगाची लागवड केल्यास शेतकरी भुईमुगाची लागवड आता नोव्हेंबर मध्ये देखील करू शकतो. लवकर लागवड केल्यामुळे भुईमुगाचे पीक देखील लवकरच काढणीस येते.
मार्च महिन्यात काढणी केली जाऊ शकते.
मल्चिंग पेपर च्या साह्याने भुईमुगाची लागवड केल्यास त्याचे अनेक फायदे शेतकऱ्यांना होतात. भुईमूग लागवड केल्यानंतर उगवण्याच्या वेळी जमिनीचे तापमान 18 अंश सेंटीग्रेड पेक्षा जास्त असणे गरजेचे असते. तापमान 13 अंश सेंटीग्रेड च्या खाली गेल्यास भुईमुगाची वाढ निट होत नाही.
भुईमूग पिकास एप्रिल – मे या महिन्यात पाण्याची सर्वाधिक गरज असते कारण या महिन्यात पीक फुलोऱ्यात असल्यामुळे पिकाला पाणी देणे जास्त गरजेचे असते त्यामुळे पाणी असलेल्या भागातच भुईमूग पिकाची लागवड केली जाते.
पण आता मल्चिंग पेपरच्या पारदर्शक प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर करून भुईमुगाची पेरणी आता कमी पाणी असलेल्या भागातील करता येऊ शकते. तसेच मल्चिंग पेपरच्या जमिनीवरील आच्छादनामुळे 5 अंश ते 8 अंश सेंटीग्रेड ने जमिनीच्या आतील होणारे पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यास मदत होते. त्यामुळे जमिनीला पाण्याची गरज कमी प्रमाणात भासते.
मल्चिंग पेपरचा वापर करून भुईमूग लागवड केलेल्या जमिनीत तन उगवत नाही. त्यामुळे मजुरांच्या खुरपणीच्या खर्चात देखील बचत होते. भुईमुगाच्या मुळांची वाढ जोमदार होते आणि मुळाचा एकूण विस्तार वाढतो.
त्यामुळे उत्पादनात देखील वाढ होते. मुळांचा विस्तार झाल्याने पीक जोमात येते जोमात आलेल्या पिकामुळे रोगांचे प्रमाण कमी होते व शेंगाचे उत्पादन वाढते. मल्चिंग पेपरच्या जमिनीवरील अच्छादनामुळे जमिनीत पिकांना उपयुक्त असणाऱ्या जिवाणू मध्ये वाढ होते व त्यामुळे शेंगा मधील तेल आणि प्रथिनांचे प्रमाण देखील वाढते.