Tractor Mileage Tips:- कुठलेही वाहन घेताना त्या वाहन चे मायलेज किती आहे? या प्रश्नाला खूप महत्त्व असते. कारण जितके मायलेज जास्त असेल तितके ते वाहन वापरायला आपल्याला परवडत असते. मग ते दुचाकी असो की ट्रॅक्टर असो यामध्ये मायलेज ला खूप महत्त्व असते. जर आपण शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या ट्रॅक्टरचा विचार केला तर शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित अनेक कामे ट्रॅक्टरच्या माध्यमातून करता येणे आता शक्य झालेले आहे.
शेतीची पूर्व मशागतीपासून तर तयार शेतीमाल बाजारपेठेपर्यंत नेण्याकरिता ट्रॅक्टरचा वापर बहुसंख्य रीतीने केला जातो. त्यामुळे जर ट्रॅक्टरचे मायलेज कमी असेल तर मात्र तुमच्या डिझेलवर खूप जास्त प्रमाणात खर्च होण्याची शक्यता असते. त्यामुळे ट्रॅक्टरने चांगले मायलेज द्यावे याकरिता आपल्याला काय करता येईल? याबद्दल देखील माहिती असणे आपल्याला गरजेचे असते. या अनुषंगाने आपण या लेखात ट्रॅक्टरचे मायलेज कोणत्या पद्धतीचा वापर केला तर वाढवता येईल? याबद्दलची माहिती घेणार आहोत.
ट्रॅक्टरला प्रति किलोमीटर साधारणपणे किती इंधन लागते?
भारतामध्ये शेतीव्यतिरिक्त अनेक कामांकरिता ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. व कामांच्या प्रकारानुसार लागणारे इंधन देखील कमी जास्त होत राहते. उदाहरणच घ्यायचे झाले तर ट्रॅक्टरने जर रोटावेटर चालवले तर तासाला अंदाजे सात ते आठ लिटर डिझेल लागू शकते. त्या उलट ट्रॅक्टरच्या सहाय्याने टिलर चालवले तर एक लिटर तेलामध्ये पाच ते सात किलोमीटरचे मायलेज ट्रॅक्टर देते. जर ट्रॅक्टर अल्टरनेटर किंवा स्ट्रॉ रिपरने चालवला तर दर तासाला सुमारे सहा ते सात लिटर डिझेल लागते.
अशा पद्धतीने वाढवा तुमच्या ट्रॅक्टरचे मायलेज
1- तुम्हालाही तुमच्या ट्रॅक्टरचे मायलेज वाढवायचे असेल तर ते करताना जेव्हा तुम्ही शेतामध्ये नांगरणी किंवा इतर शेतीचे कामे करतात तेव्हा ट्रॅक्टर रुंदीने चालवण्याऐवजी लांबीने चालवावा.
2- तुमच्या ट्रॅक्टरची इंजिन साफ करत राहावे त्यामुळे इंजिनमध्ये हवेचा सतत संचार होत राहतो व त्यामुळे देखील मायलेज चांगले मिळते.
3- तसेच इंजिनच्या ऑइल वेळेवर बदलत राहावे. तुम्ही ऑइल जर वेळोवेळी चेंज करत राहिले तर इंधनचा वापर कमी होतो आणि तुमची बचत होते.
या तीन प्रकारच्या उपायांनी देखील तुम्ही ट्रॅक्टरचा मायलेज चांगल्या प्रकारे वाढवू शकतात.
भारतातील चांगले मायलेज ट्रॅक्टर
तुम्हाला देखील चांगले मायलेज देणारे ट्रॅक्टर हवे असेल तर तुम्ही खालीलपैकी भारतातील या टॉप पाच ट्रॅक्टर पैकी त्याची निवड करू शकतात. यामध्ये
1- महिंद्रा 265 डीआय पावर प्लस
2- महिंद्रा 475 डीआय ट्रॅक्टर
3- जॉन डियर 5075 E-4WD ट्रॅक्टर
4- स्वराज 735 एफइ ट्रॅक्टर
5- न्यू हॉलंड 3630 TX प्लस ट्रॅक्टर
हे पाच ट्रॅक्टर उत्तम मायलेज करिता प्रसिद्ध आहेत.