Unhali Kanda Market : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कांदा बाजार भावात चांगली सुधारणा पाहायला मिळाले आहे. राज्यातील अनेक बाजारांमध्ये चिंचवड आणि लाल कांद्याला चांगला भाव मिळत आहे. आज देखील राज्यातील पेन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याला कमाल 4000 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार या मार्केटमध्ये आज लाल कांद्याला किमान 3800, कमाल 4000 आणि सरासरी 3800 असा विक्रमी दर मिळाला आहे. याशिवाय इतरही बाजारांमध्ये आज लाल कांद्याला चांगला विक्रमी दर मिळाला आहे. लाल कांद्याला आज सरासरी 2500 ते 3800 असा भाव मिळाला आहे.
यामुळे गेल्या अनेक महिन्यांनी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव स्पष्टपणे झळकत आहेत. आतापर्यंत कमी बाजारभावामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले होते ते नुकसान या विक्रमी बाजारभावाने भरून काढता येणे शक्य होणार आहे. तथापि आगामी काळातही असाच भाव कायम राहावा अशी इच्छा शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
सरकारने आता तरी या प्रकरणात ढवळाढवळ करू नये अशी मागणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आली आहे. दरम्यान आता आपण राज्यातील बाजारांमध्ये उन्हाळी कांद्याला काय भाव मिळत आहे याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
उन्हाळी कांद्याला काय दर मिळतोय
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 800, कमाल 3000 आणि सरासरी 2650 असा दर मिळाला आहे.
येवला अंदरसुल कृषी उत्पन्न बाजार समिती : येवल्याच्या या उपबाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 800, कमाल 3125 आणि सरासरी 2800 असा भाव मिळाला आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 1200, कमाल 3001 आणि सरासरी 2600 रुपये भाव मिळाला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला कमाल 3301, सरासरी 3100 आणि किमान 1000 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
लासलगाव विंचुर कृषी उत्पन्न बाजार समिती : लासलगावच्या या उपबाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 1200, कमाल 3300 आणि सरासरी 3 हजार 50 असा विक्रमी दर मिळाला आहे.
सिन्नर नायगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 1000, कमाल 3 हजार 78 आणि सरासरी 2900 प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 300, कमाल 3300 आणि सरासरी 2200 असा भाव मिळाला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 700, कमाल 3503 आणि सरासरी 3 हजार 50 असा भाव मिळाला आहे.