Unhali Bajari Lagwad : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये गव्हाची हार्वेस्टिंग पूर्ण झाली आहे. हरभरा देखील काढला गेला आहे. एकंदरीत रब्बीचा हंगाम आता आटोपला आहे. अशातच हवामान खात्याने यंदा मान्सून चांगला राहणार असाही अंदाज दिला आहे. त्यामुळे शेतकरी आगामी खरीप हंगामासाठी विशेष उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.
मात्र रब्बी हंगामातील पिकांची काढणी झाल्यानंतर दोन महिने ती जमीन तशीच पडून राहते. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांकडे पर्याप्त पाण्याची सुविधा आहे असे शेतकरी बांधव उन्हाळी हंगामात दोन-अडीच महिन्यात काढणीसाठी तयार होणाऱ्या पिकांची लागवड करतात.
यात बाजरीची देखील मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. दरम्यान जर तुम्हीही उन्हाळी हंगामात बाजरी पेरणी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास ठरणार आहे.
आज आपण बाजरी या प्रमुख तृणधान्य पिकाच्या उन्हाळी हंगामातील काही सुधारित जातींची अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
उन्हाळी हंगामात शेतकरी बांधवांनी बाजरीच्या कोणत्या जातींची लागवड केल्यास त्यांना चांगले उत्पादन मिळू शकते याबाबत आता आपण माहिती पाहणार आहोत.
उन्हाळी हंगामासाठी उपयुक्त बाजरीच्या जाती
बाजरी हे प्रमुख तृणधान्य पीक आहे. दरम्यान तृणधान्य उत्पादनाला चालना मिळावी यासाठी केंद्र शासन विशेष आग्रही आहे. तृणधान्यात असणारे औषधी गुणधर्म पाहता अलीकडे तृणधान्यांना बाजारात मागणी वाढली आहे.
बाजरीला देखील बाजारात मोठी मागणी पाहायला मिळत आहे. हेच कारण आहे की, बाजरीचे उत्पादन वाढवण्यासाठी देशातील कृषी संशोधकांनी बाजरीच्या सुधारित जाती विकसित केल्या आहेत.
कृषी विद्यापीठांच्या कृषी शास्त्रज्ञांनी R-9251, TG-37, R-8808, G.H.B.-526, P.B. 180 या जाती विकसित केल्या आहेत. पुसा कंपोझिट- 383, ICTP 8203, राज या क्लस्टर वाणांचा देखील यात समावेश होतो.
171 आणि ICMV. 221, GHB 558, GHB 86, M- 52, DH- 86, ICGS-44, ICGS-1 या जाती देखील कृषी संशोधकांनी विकसित केल्या आहेत. दरम्यान, बाजरीच्या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी शेतकरी बांधव बाजरीच्या या सुधारित वाणांची पेरणी सुरू करू शकतात.