तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी अखेर राज्य शासनाने ‘तो’ निर्णय घेतलाच ! आता शेतकऱ्यांच्या मालाला मिळणार अधिकचा भाव, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tur Farming : महाराष्ट्रात खरीप हंगामामध्ये सोयाबीन, कापूस या दोन मुख्य पिकांसमवेतच तुर पिकाची देखील मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. खरीप हंगामातील तूर एक महत्त्वाचे पीक आहे. या पिकाची शेती मराठवाडा, विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते.

खान्देश विभागात देखील तुर पिक लागवडीखालील क्षेत्र बऱ्यापैकी आहे. एकंदरीत राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण तुर पिकावर अवलंबून आहे. दरम्यान गेल्या वर्षभरापासून सोयाबीन आणि कापसाला अपेक्षित असा भाव मिळतं नसला तरी तुरीला मात्र चांगला दर मिळतोय.

तथापि शेतकऱ्यांच्या माध्यमातून नाफेडच्या मार्फत तूर खरेदी केली गेली पाहिजे अशी मागणी केली जाते. पण नाफेडने खुल्या बाजारात जो भाव मिळतोय त्याच बाजारभावात तुरीची खरेदी करावी अशी मागणी शेतकऱ्यांची होती.

दरम्यान याच मागणीच्या पार्श्वभूमीवर नाफेडच्या माध्यमातून खुल्या बाजारात तुरीला जो दर मिळतोय त्याच बाजार भावात तूर खरेदी करण्याचा एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे.

त्यामुळे राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त केला जात आहे. हाती आलेल्या माहितीनुसार मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जाधववाडी आणि गंगापूर या दोन ठिकाणी नाफेडच्या माध्यमातून दूर खरेदी केली जाणार आहे.

विशेष बाब म्हणजे लवकरच यासाठी ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नाफेडकडे जर तुर विकायची असेल तर ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेत लवकरात लवकर आपले नाव नोंदवावे लागणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या या दोन्ही केंद्रांवर 13 डिसेंबर 2023 पासून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच शेतमाल विक्रीसाठी नोंदणी करायची आहे.

शासनाने यंदा तूर सहित सर्व कडधान्य बाजारभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे बाजार समित्यांमध्ये जो दर मिळेल त्याचं दरात शेतमालाची खरेदी या ठिकाणी होणार आहे.यामुळे साहजिक छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यासहित राज्यभरातील कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, नाफेडच्या खरेदीचा एक मोठा फायदा असा की खुल्या दराने खरेदी होणार असल्याने व्यापाऱ्यामध्ये स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या शेतकऱ्यांना दरवाढीसाठी फायदा होणार आहे.

सध्या तुरीला बाजारात साडे सात ते आठ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. तर शासनाने 7000 रुपयाचा हमीभाव दिला आहे. अर्थातच हमीभावापेक्षा 500 ते 1000 रुपये अधिक दरात तुरीची विक्री होत आहे. दरम्यान आता नाफेड देखील बाजारात जो दर मिळत आहे त्याच दरात तुरीची खरेदी करणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा