Tulip Wind Turbine : गेल्या काही वर्षांपासून सर्वसामान्य जनता महागाईने बेजार झाली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य लोकांना संसाराचा गाडा चालवणे कठीण होऊ लागले आहे. संसारासाठी आवश्यक सर्वच वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
सर्वसामान्य नागरिक वाढीव वीज बिलामुळे देखील खूपच त्रस्त आहेत. विशेष म्हणजे विजेच्या किमती दिवसेंदिवस वाढतच आहेत. महावितरणकडून सातत्याने वीज दरवाढ केली जात आहे. त्यामुळे घरगुती वीज ग्राहकांना याचा मोठा फटका बसत आहे.
दरम्यान आज आम्ही वाढीव विजबिलाने त्रस्त नागरिकांसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन हजर झालो आहोत. आज आपण विज बिलापासून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वसामान्य लोकांनी काय केले पाहिजे याविषयी पाहणार आहोत.
खरेतर अलीकडे अनेकांनी वीज बिलापासून मुक्ती मिळवण्यासाठी सौर ऊर्जेचे पॅनल बसवले आहेत. पण, आज आपण अशा एका उपकरणाची माहिती जाणून घेणार आहोत जे उपकरण घराच्या छतावर बसवल्यास वीजबिलापासून मुक्ती मिळवली जाऊ शकते.
एवढेच नाही तर हे उपकरण लावण्याचा खर्च हा सौरऊर्जेपेक्षा काहीसा कमी राहणार आहे. यामुळे सर्वसामान्यांना कमी खर्चात हे उपकरण बसवता येणार आहे.
एकदा की हे उपकरण बसवण्यासाठी खर्च केला की आयुष्यभर यातून मोफत वीज मिळत राहणार आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या उपकरणाविषयी सविस्तर माहिती.
कोणते आहे हे उपकरण
आम्ही ज्या उपकरणाबाबत बोलत आहोत ते आहे ट्यूलिप विंड टर्बाइन. हे उपकरण पवन ऊर्जा जनरेटर म्हणून ओळखले जाते. या उपकरणात एक पावर जनरेटर बसवण्यात आला आहे. याच्या मदतीने हवेच्या माध्यमातून वीज निर्मिती होते.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा हवा या मशीनच्या पंख्यावर आदळते तेव्हा याचे ब्लेड म्हणजे पाते फिरतात आणि या पंख्यांमधून जनरेटर चालू होऊन वीजनिर्मिती सुरु होत असते.
या उपकरणाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हवेचा वेग कमी असला तरी देखील वीजनिर्मिती होऊ शकते. यातून तयार झालेली थेट घरात वापरता येते. बॅटरी मध्ये ही स्टोर करता येते.
किती खर्च लागणार
जर तुम्हीही वीज बिलापासून मुक्ती मिळवण्यासाठी हे उपकरण तुमच्या घराच्या छतावर बसवण्याच्या तयारीत असाल तर आधी यासाठी किती खर्च येतो हे जाणून घ्या. खरेतर हे उपकरण 50 हजारांपासून ते दोन लाख रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र किमतीत स्थानानुसार आणि मशीनच्या आकारमानानुसार बदल होऊ शकतो.