Tractor Subsidy Yojana : महाराष्ट्रासहित देशातील सर्वच राज्यांमध्ये शेती हा मुख्य व्यवसाय आहे. भारताची अर्थव्यवस्था देखील शेतीवर अवलंबून आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी आणि शेती क्षेत्राच्या कल्याणासाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू आहे.
शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करता यावी यासाठी यांत्रिकीकरणाला देखील चालना दिली जात आहे. त्यांना नवनवीन यंत्र खरेदी करण्यासाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य उपलब्ध होत आहे. यामध्ये ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी देखील शेतकऱ्यांना काही ठराविक रक्कम अनुदान स्वरूपात दिली जात आहे.
यामध्ये मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांना सव्वातीन लाख रुपयांचे अनुदान महाराष्ट्र राज्य शासनाकडून मिळत आहे. दरम्यान याच मिनी ट्रॅक्टर अनुदान योजने संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती समोर आली आहे.
ती म्हणजे या योजनेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांकडून गेल्या काही दिवसांपासून अर्ज मागवले जात असून उद्या अर्थातच 20 फेब्रुवारी 2024 हा या योजनेसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. अशा परिस्थितीत मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी पात्र ठरत असलेल्या अधिका अधिक शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेचे स्वरूप
ही योजना महाराष्ट्रात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून राबवली जात आहे. ही योजना राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सुरू झालेली योजना आहे.
याअंतर्गत अनुसूचित जाती आणि नव बौद्ध प्रवर्गातील बचत गटांना मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान उपलब्ध होते. इतर कोणत्याच बचत गटांना यासाठी अनुदान मिळणार नाही. किमान 80 टक्के अनुसूचित जाती प्रवर्गातील सदस्य असलेल्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान मिळणार आहे.
यामध्ये अध्यक्ष आणि सचिव हे सुद्धा अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. या योजनेच्या माध्यमातून मिनी ट्रॅक्टर आणि त्याच्या उपसाधनांच्या खरेदीसाठी सव्वातीन लाख रुपयांचे अनुदान मिळते.
अर्थातच या अंतर्गत मिनी ट्रॅक्टर आणि त्याच्या उपसाधनाची कमाल किंमत साडेतीन लाख रुपये ठरवण्यात आली आहे. यामध्ये या किमतीचे 90% अर्थातच सव्वा तीन लाख रुपयांचे अनुदान हे पात्र बचत गटांना मिळते. उर्वरित दहा टक्के अर्थातच पस्तीस हजार रुपये शेतकऱ्यांना भरावे लागतात.
आवश्यक कागदपत्रे
बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र.
गटातील सदस्यांचे जातीचे दाखले
बचत गटातील सदस्यांचे रहिवासी प्रमाणपत्र आणि आधार कार्ड
गटातील सभासदाचे रेशन कार्ड
बचत गटाचे राष्ट्रीयीकृत बँकेत बचत गटाच्या नावे बँक खाते
बचत गटाचे ताळेबंद प्रमाणपत्र