Top Tourist Places To Visit In October : ऑक्टोबरची सुरुवात होऊन एक आठवडा उलटला आहे. महाराष्ट्रातून मान्सूनने काढता पाय घेतला आहे. आतापर्यंत निम्म्या महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरला आहे. पुणे, मुंबईसह राज्यातील जवळपास 45 ते 50 टक्के भागांमधून मान्सून माघारी फिरला असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
यामुळे राज्यातील बहुतांशी भागातील हवामान आता प्रामुख्याने कोरडे राहणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे सहाजिकच उकाडा वाढणार आहे. आता ऑक्टोबर हिटचा सामना करावा लागणार आहे. या ऑक्टोबर हिटमध्ये मात्र जर तुमचा फिरायला जाण्याचा प्लॅन असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे.
कारण की आज आम्ही तुमच्यासाठी ऑक्टोबर हिट मध्ये फिरण्यासारखी टॉप पाच निसर्गरम्य पर्यटन स्थळ कोणती आहेत याची माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग वेळ न दवडता थेट मुद्द्याला हात घालूया आणि भारतातील टॉप पाच निसर्गरम्य पर्यटन स्थळे कोणती याविषयी जाणून घेऊया.
हंपी : कर्नाटक मधील हे एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. या पर्यटन स्थळाचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये केला जातो. यावरून आपणास या पर्यटन स्थळाचे महत्त्व लक्षात आलेच असेल. हे भारतातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे.
येथे दरवर्षी देशातून तसेच विदेशातून लाखो पर्यटक हजेरी लावतात. जर तुम्हीही ऑक्टोबर हिट मध्ये कुठे फिरण्याचा प्लॅन बनवत असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकते. जर तुम्हाला ऐतिहासिक वास्तू पाहण्याचा मोह असेल.
प्राचीन मंदिरे, बारीक नक्षीकाम आणि विशाल रचना पाहण्याची आवड असेल तर तुम्ही या शहराला निश्चितच भेट दिली पाहिजे. तुम्ही हम्पी येथे भेट देऊन विविध देवी-देवतांच्या मंदिरांचे दर्शन घेऊ शकता. आपल्या भारतीय संस्कृतीचे दर्शन घ्यायचे असेल तर इथे एकदा नक्कीच भेट द्या.
कोलकाता : कोलकत्ता हे ठिकाण देखील फिरण्यासारखे आहेत. येथील निसर्गरम्य सुंदरता तुमच्या मनाला मोहनारी ठरेल. खरंतर हे शहर सामाजिक विविधतेने लटलेले आहे. तुम्हाला येथे हिंदू मुस्लिम भाईचारा पाहायला मिळेल.
या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यात दुर्गा पुजा मोठ्या उत्साहात साजरा केली जाते. ज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या शहरात गणेशोत्सवाचा सण साजरा केला जातो त्याप्रमाणे ऑक्टोबर मध्ये कोलकत्यात दुर्गापूजा मोठ्या आनंदात साजरा होते.
हा उत्सव डोळ्यांनी टिपायचा असेल तर एकदा कोलकत्याला ऑक्टोबर महिन्यात भेट दिलीच पाहिजे. याशिवाय इथल्या निक्को पार्क, विक्टोरिया मेमोरियल यांसारख्या इतर ठिकाणांना देखील भेट दिली जाऊ शकते.
ऋषिकेश : तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात जायचे असेल, ऑक्टोबर हीटमुळे परेशान झाला असाल तर एकदा ऋषिकेश ला जा. येथे तुम्हाला डोंगर, दऱ्या, नद्याची सुंदरता पाहता येणार आहे. येथील मंदीरे, पुल, नदी, धबधबा आणि त्रिवेणी घाट प्रमुख आकर्षणे आहेत. त्यामुळे जर तुम्ही फिरायचा प्लॅन बनवला असेल तर ऋषिकेश तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरणार आहे.
दार्जिलिंग : ऑक्टोबरची सुरुवात झाली की ऑक्टोबर हिटमुळे सर्वजण परेशान होतात. या महिन्यात पावसाळा संपतो आणि हिवाळा ऋतूकडे वाटचाल होते. यामुळे हा महिना संक्रमणाचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात मोठ्या प्रमाणात हिट तयार होते.
ही हिट उन्हाळ्यापेक्षा घातक असते. यामुळे अनेक जण ऑक्टोबर मध्ये फिरायला निघतात. जर तुम्हीही फिरण्याचा प्लॅन बनवत असाल तर दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकते. येथे ऑक्टोबर महिन्यात दरवर्षी हजारो पर्यटक भेटी देतात तुम्हीही भेट दिली तर काही वावगे ठरणार नाही.
दार्जिलिंग मधील वातावरण तुम्हाला खुश करू शकते. पश्चिम बंगालमधील हे एक सर्वोत्कृष्ट ठिकाण आहे. येथील पद्मजा नायडू पार्क, रॉक गार्डन, टायगर हिल या ठिकाणाला तुम्ही भेट दिली तर तुमचा ऑक्टोबर फिरण्याचा प्लॅन सार्थकी लागेल.