Tomato Farming : भारतात भाजीपाला (Vegetable Crop) किंवा तरकारी पिकांची शेती (Farming) मोठ्या प्रमाणात केली जाते. या तरकारी पिकांमध्ये टोमॅटो (Tomato Crop) या पिकाचा देखील समावेश केला जातो. आपल्या महाराष्ट्रात देखील टोमॅटो पिकाची शेती विशेष उल्लेखनीय आहे. अल्प कालावधीत आणि कमी खर्चात काढण्यासाठी तयार होणार आहे या पिकाची शेती शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सौदा सिद्ध होत आहे.
मित्रांनो बाजारात टोमॅटो पिकाला कायमच मागणी असल्याने अलीकडे टोमॅटो शेती विशेष लोकप्रिय होत आहे. मित्रांनो मीडिया रिपोर्टनुसार टोमॅटोची एक हेक्टर मध्ये शेती केल्यास शेतकऱ्यांना (Farmer) तब्बल पंधरा लाखांपर्यंत कमाई (Farmer Income) होऊ शकते. अशा परिस्थितीत आज आपण टोमॅटो लागवड कशा पद्धतीने (Tomato Crop Management) केले जाऊ शकते याविषयी जाणून घेणार आहोत.
टोमॅटोची लागवड
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, शेतकरी कोणत्याही प्रकारच्या जमिनीत टोमॅटोची लागवड करू शकतात, परंतु कृषी शास्त्रज्ञांच्या मते, वालुकामय चिकणमाती, चिकणमाती, लाल आणि काळी माती असलेली जमीन त्याच्या लागवडीसाठी सर्वात योग्य मानली जाते. मात्र शेतीमध्ये पाण्याचा निचरा करण्याची योग्य व्यवस्था असावी याची शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. भारतात टोमॅटोची लागवड वर्षातून दोनदा करता येते. शेतकऱ्यांनी पहिली लागवड जुलै-ऑगस्टमध्ये सुरू करावी जी फेब्रुवारी-मार्चपर्यंत संपेल. त्याच वेळी, दुसरी लागवड नोव्हेंबर-डिसेंबरपासून सुरू होते आणि जून-जुलैपर्यंत संपते.
एक हेक्टर ते 800-1200 क्विंटल
टोमॅटो पिकाची योग्य लागवड केल्यानंतर आणि योग्य ते पीक व्यवस्थापन केल्यानंतर शेतकरी बांधव 1 हेक्टर जमिनीतून सुमारे 800-1200 क्विंटल उत्पादन मिळवू शकतात. त्याच्या सुधारित लागवडीमुळे शेतकरी कमी खर्चात अधिक नफा कमावतात. जर तुम्ही 1 हेक्टर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली तर शेतकरी त्यातून 15 लाखांपर्यंत सहज कमाई करू शकतात. शेतकरी बांधवांना बाजारपेठेत टोमॅटोला चांगला दर मिळाला तर निश्चितच एवढी कमाई करता येणे शक्य आहे.
टोमॅटोच्या सुधारित जाती
टोमॅटोच्या लागवडीतून चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी नेहमी सुधारित वाणांची निवड करावी. यासाठी तुम्ही टोमॅटोचे देशी वाण निवडू शकता. जसे पुसा शीतल, पुसा-120, पुसा रुबी, पुसा गौरव, अर्का विकास, अर्का सौरभ आणि सोनाली इ. याशिवाय टोमॅटोच्या संकरित जातीही बाजारात आहेत. जसे पुसा हायब्रिड-2, पुसा हायब्रीड-4, रश्मी आणि अविनाश-2 इ.
टोमॅटो शेती मधील काही महत्वाच्या बाबी
जर तुम्ही 1 हेक्टर जमिनीत टोमॅटोची लागवड करत असाल तर तुम्हाला सुमारे 500 ग्रॅम बियाणे लागेल. त्यात संकरित बियाणे 250-300 ग्रॅम पर्यंत असावे हे लक्षात ठेवा.
त्यानंतर शेतात बिया टाकून रोपवाटिका चांगली तयार करावी. असे केल्यावर सुमारे एक महिन्यात टोमॅटोची रोपे शेतात लावण्यासाठी योग्य होतात.
त्यानंतर शेताच्या सिंचनावर भर द्यावा लागेल. जर तुम्ही हिवाळ्यात लागवड करत असाल तर तुम्हाला 10-15 दिवसांच्या अंतराने शेतात पाणी द्यावे लागेल आणि उन्हाळी हंगामात तुम्हाला 6-7 दिवसांच्या अंतराने शेतात पाणी द्यावे लागेल.
टोमॅटोच्या लागवडीसाठी तापमानाबद्दल बोलायचे झाले तर, उष्ण हवामान क्षेत्र त्यासाठी चांगले मानले जाते, परंतु थंड हंगामात शेतकरी ते करू शकत नाहीत असे नाही. थंडीच्या मोसमातही याच्या लागवडीतून लाखोंचा नफा मिळू शकतो. पिकाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी तापमान 21-23 °C च्या आसपास असावे.
खताचा वापर
टोमॅटो लागवडीत शेतकऱ्याने शेणखत, नत्र, स्फुरद, पालाश, बोरॅक्स यांचा वापर करावा. जेणेकरून पीक सुरक्षित राहू शकेल.
तण नियंत्रण
शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडीत तण नियंत्रणाचीही काळजी घ्यावी. त्यासाठी शेतात आवश्यकतेनुसार खुरपणी करावी. याशिवाय शेत तयार करताना फ्लुक्लोरालिन (बेसालिन) किंवा पेंडीमेथालिनची फवारणी लावणीनंतर 7 दिवसांच्या आत करावी.