महाराष्ट्र राज्यातील महिला उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महिला आर्थिक सक्षमीकरण उपक्रम राबविण्यात येत आहे. महिला असाल किंवा तुमच्या घरातील एखादी महिला एखादा उद्योग किंवा व्यवसाय करू इच्छित असेल तर लगेच ऑनलाईन अर्ज करून टाका.
कोणकोणत्या महिल्या यासाठी पात्र असणार आहेत. हि आणि इतर महत्वाची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. महिला आर्थिक सक्षमीकरण उपक्रम योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्जाची लिंक खाली दिलेली आहे.
महिला विकास योजना अंतर्गत शासकीय योजनांचा लाभ घ्या. महिला ग्रामीण भागातील असो, किंवा शहरी भागातील असो पात्रतेसाठी कोणती अडचण नाही. ज्या महिला स्वतःचा उद्योग उभारू इच्छित आहेत पण त्यांच्याकडे भांडवल नाही. अश्या महिलांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत
विशेषतः ग्रामीण भागातील अनेक महिला स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय करण्यास इच्छुक असतात. अशा महिलांना योग्य मार्गदर्शन आणि शासकीय योजनेचा लाभ मिळाला तर ह्या भगिनी नक्कीच चमकदार कामगिरी करून दाखवितील यात शंका नाही.
ग्रामीण भागातील महिलांना वाव – हीच बाब लक्षात घेवून महाराष्ट्र शासनाच्या वतीने महिला आर्थिक सक्षमीकरण उपक्रम राबविण्यात येत आहे. या महिला विकास योजना संदर्भातील ऑनलाईन अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यापूर्वी जाणून घेवूयात कि हि योजना नेमकी कशी आहे.
महाराष्ट्रातील ज्या महिला उद्योजिका आहेत त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी महिला आर्थिक सक्षमीकरण उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबविण्यात येत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या ऑनलाईन अर्जांपैकी १२० अर्ज निवडले जाणार आहेत. निवडलेल्या महिलांना विशेष व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.
नवीन महिला विकास – हा कार्यक्रम ८ मार्च २०२२ म्हणजेच अंतरराष्ट्रीय महिला दिनापासून सुरु होणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये महिलांना यशस्वी व्यवसाय करण्यासाठी अनेक टिप्स देण्यात येतील. जसे कि वित्तपुरवठा, गुंतवणूकदार आणि ग्राहकांपर्यंत जास्तीत जास्त कसे पोहचता येईल या संदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल.
अमेरिकी दूतावास, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी व अलायन्स फॉर कमर्शियलायझेशन अँड इनोव्हेशन रिसर्च म्हणजेच ACIR यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जाणार आहे. ज्या महिला स्वतःचा उयोग व्यवसाय करू इच्छित असेल त्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आलेले आहे.
योजनेसाठी पात्रता काय असेल – योजनेचे नाव महाराष्ट्र महिला आर्थिक सक्षमीकरण उपक्रम या योजनेसाठी केवळ महिलाच अर्ज करू शकतात.
अर्ज पद्धत ऑनलाईन – ऑनलाइन अर्ज लिंक https://www.mahawe.in/ अधिकृत वेबसाईट लिंक आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०२२ वरील दिलेल्या माहितीचा स्त्रोत https://mahasamvad.in/?p=60389 महासंवाद वेबसाईट आहे.
योजनेसाठी लाभार्थी पात्रता –
या योजनेसाठी फक्त महिला लाभार्थीच ऑनलाईन अर्ज करू शकतात.
अर्जदार महिला हि नाविन्यपूर्ण उपक्रम किंवा स्टार्टअपची संस्थापक असणे आवश्यक आहे.
जी महिला यासाठी ऑनलाईन अर्ज करणार आहे त्या महिलेचे वय १८ वर्षापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
अर्जदारास इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
भारतीय नागरिक व महाराष्ट्र निवासी महिलाच या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत.
वरील लाभार्थी या योजनेसाठी पात्र असतील.
असा करा ऑनलाईन अर्ज. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र महिला आर्थिक सक्षमीकरण कार्यक्रम या वेबसाईटवर जावून तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. डायरेक्ट ऑनलाईन अर्ज पेजवर जाण्यासाठी येथे टच करा. https://startupnexus.formstack.com/forms/mahawe
महाराष्ट्र महिला आर्थिक सक्षमीकरण कार्यक्रम या वेबसाईट ओपन केल्यानंतर मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषेमध्ये हि वेबसाईट तुम्हाला दिसेल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अर्ज करा किंवा apply now या बटनावर क्लिक करा. जसे हि तुम्ही apply now किंवा अर्ज करा या बटनावर क्लिक कराल त्यावेळी ऑनलाईन फॉर्म तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलस्क्रीनवर ओपन होईल. तुमच्याकडून जी माहिती मागविली जाईल ती माहिती तुम्ही त्यात भरू शकता आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता.