रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ प्रवाशांना मिळणार तिकीट दरात शंभर टक्के सूट, कोणाला मिळणार लाभ? वाचा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Railway News : भारतात रेल्वे हे प्रवासाचे एक मुख्य साधन आहे. हेच कारण आहे की भारतीय रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांसाठी वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत.

रेल्वे वाहतूक मजबूत करण्यासाठी नवनवीन रेल्वे मार्ग तयार केले जात आहेत. वंदे भारत एक्सप्रेस सारख्या हाय स्पीड ट्रेन चालवल्या जात आहेत. एवढेच नाही तर भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी अनेक प्रकारच्या सुविधा देखील पुरवत आहे.

खरे तर आपल्या देशात एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी रेल्वेला पसंती दाखवली जाते. रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणार आहे. यामुळे या प्रवासाला नेहमीच पसंती दाखवली जाते. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे भारतातील कोणत्याही कोपऱ्यात रेल्वे पोहोचलेली आहे.

रेल्वेचे जाळे संपूर्ण देशभर विस्तारलेले असल्याने कोणत्याही कोपऱ्यात जायचे असेल तर रेल्वेने जाता येणे शक्य होते. शिवाय भारतीय रेल्वेच्या माध्यमातून काही प्रवाशांना तिकीट दरात सवलत देखील दिली जात आहे.

ज्याप्रमाणे बसमध्ये प्रवास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने तिकीट दरात महिलांना 50 टक्के आणि 75 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना शंभर टक्के एवढी सवलत आणि अपंग व्यक्तींना सवलत दिली आहे तशीच सवलत भारतीय रेल्वेमध्ये देखील देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भारतात रेल्वेने प्रवास करण्यासाठी दिव्यांग लोकांना आणि विशिष्ट आजाराने ग्रसित असलेल्या लोकांना तिकट दरात 100% पर्यंतची सवलत दिली जात आहे.

कोणत्या लोकांना मिळते सवलत

भारतीय रेल्वे मनोरुग्ण आणि दृष्टिहीन लोकांसाठी तिकीट दरात 50% पासून ते 75% पर्यंतची सवलत देते. विशेष म्हणजे या लोकांसोबत जे Care Taker प्रवास करतात त्यांना देखील ही सवलत लागू होते.

याशिवाय मूकबधिर लोकांना 25 टक्क्यांपासून 50% पर्यंतची तिकीट दरात सवलत मिळते. यामध्ये राजधानी शताब्दी यांसारख्या ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी पंचवीस टक्के एवढी सवलत मिळते.

तसेच कॅन्सरच्या रुग्णांना तिकीट दरात 50% पासून 100% पर्यंतची सवलत दिली जाते. विशेष म्हणजे या रुग्णांसोबत असलेल्या जोडीदाराला देखील ही सवलत मिळते. किडनी पेशंट रुग्णांना देखील 50% पासून 75% पर्यंतचे तिकीट दरात सवलत मिळते.

ॲनिमियाच्या रुग्णांना 50 टक्के एवढीच तिकीट दरात सवलत मिळते. टीबी असलेल्या रुग्णांना 75 टक्के एवढी टिकीट दरात सवलत मिळते. हिमोफिलिया असलेल्या रुग्णांना देखील 75% पर्यंतची सवलत दिली जाते.

रुग्णासोबत असलेल्या व्यक्तींना देखील हे सवलत लागू होते. मात्र या सवलतीच्या दरात तिकीट घेण्यासाठी मेडिकल सर्टिफिकेट किंवा अपंग असल्याचे सर्टिफिकेट सादर करावे लागते.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा