Top Mileage Tractor : शेती करण्यासाठी देशातील शेतकरी आता आधुनिक अवजारांचा वापर करत आहेत. पूर्वी शेती करण्यासाठी बैलांचा वापर केला जात होता. मात्र आता आधुनिक शेतीसाठी आधनिक अवजारांचाच वापर केला जात आहे.
देशात अनेक कंपन्यांकडून त्यांचे शक्तिशाली ट्रॅक्टर सादर करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांचा काही निवडक ट्रॅक्टरलाच चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुम्हीही शेतीसाठी उत्कृष्ट मायलेज देणारे ट्रॅक्टर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मार्केटमध्ये 5 ट्रॅक्टर उपलब्ध आहेत.
भारतातील टॉप 5 सर्वोत्तम मायलेज देणारे ट्रॅक्टर
महिंद्रा 275 DI इको ट्रॅक्टर
महिंद्राकडून त्यांचे अनेक छोटे मोठे ट्रॅक्टर बाजारात सादर करण्यात आले आहेत. महिंद्राचा 275 DI इको ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे. 2048 cc क्षमतेचे 3 सिलेंडर वॉटर कूल्ड इंजिन ट्रॅक्टरमध्ये देण्यात आले आहे.
हे इंजिन 35 HP पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. ट्रॅक्टरमध्ये 45 लिटर क्षमतेची इंधन टाकी देण्यात आली आहे. 1880 मिमी व्हीलबेस आणि 320 मिमी ग्राउंड क्लिअरन्स देखील देण्यात आला आहे.
महिंद्रा 275 DI इको ट्रॅक्टरची एक्स-शोरूम किंमत 4.5 लाख ते 5.00 लाख रुपये आहे. पॉवर स्टीयरिंगसह 8 फॉरवर्ड + 2 रिव्हर्स गीअर्ससह गीअरबॉक्स ट्रॅक्टरमध्ये देण्यात आला आहे.
स्वराज 735 FE ट्रॅक्टर
स्वराज 735 FE ट्रॅक्टर देखील शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे. ट्रॅक्टरमध्ये 2734 सीसी क्षमतेचे 3 सिलिंडर वॉटर कूल्ड इंजिन देण्यात आले आहे जे 40 HP पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. ट्रॅक्टरमध्ये 48 लिटर क्षमतेच्या इंधन टाकी देण्यात आली आहे.
ट्रॅक्टरमध्ये 1930 मिमी व्हीलबेस देण्यात आला आहे. पॉवर स्टीयरिंगसह 8 फॉरवर्ड + 2 रिव्हर्स गीअर्ससह गिअरबॉक्स देण्यात आला आहे. स्वराज 735 FE ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत 5.85 लाख ते 6.20 लाख रुपये आहे.
न्यू हॉलंड 3230 TX ट्रॅक्टर
न्यू हॉलंड 3230 TX ट्रॅक्टर देखील शेती करण्यासाठी शक्तिशाली ट्रॅक्टरचा उत्तम पर्याय आहे. ट्रॅक्टरमध्ये 2500 cc 4 सिलेंडर इंजिन दिले आहे जे 44 HP पॉवर तयार करते. ट्रॅक्टरमध्ये 46 लिटरची इंधन टाकी देण्यात आली आहे. ट्रॅक्टरमध्ये 1920 मिमी व्हीलबेस देण्यात आला आहे.
न्यू हॉलंड 3230 TX ट्रॅक्टरला पॉवर/मेकॅनिकल स्टीयरिंगसह 8 फॉरवर्ड + 2/8 रिव्हर्स गिअर्ससह गिअरबॉक्स देण्यात आला आहे. न्यू हॉलंड 3230 TX ट्रॅक्टरची किंमत 8.40 लाख ते 8.75 लाख रुपये आहे.
John Deere 5050 D ट्रॅक्टर
जॉन डीअर 5050 D ट्रॅक्टरमध्ये 2900 सीसी 3 सिलिंडर असलेले नॅचरली एस्पिरेटेड इंजिन देण्यात आले आहे जे 50 एचपी पॉवर तयार करण्यास सक्षम आहे. ट्रॅक्टरला 1970 मिमी व्हीलबेस देण्यात आला आहे. John Deere 5050 D ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत 7.40 लाख ते 8.00 लाख रुपये दरम्यान आहे. ट्रॅक्टरमध्ये पॉवर स्टीयरिंगसह 8 फॉरवर्ड + 4 रिव्हर्स गियरबॉक्स देण्यात आला आहे.
आयशर 380 ट्रॅक्टर
आयशर 380 ट्रॅक्टर ट्रॅक्टर देखील उत्तम मायलेज आणि शक्तिशाली ट्रॅक्टरपैकी एक आहे. आयशर 380 ट्रॅक्टरमध्ये 3 सिलेंडर वॉटर कूल्ड इंजिन देण्यात आले आहे जे 40 एचपी पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. आयशर 380 ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत 6.10 लाख ते 6.40 लाख रुपये आहे. ट्रॅक्टरमध्ये पॉवर स्टीयरिंगसह 8 फॉरवर्ड + 2 रिव्हर्स गीअर्ससह गिअरबॉक्स देण्यात आला आहे.