krushi marathi :-शेतकऱ्यांचा खरीप हंगामातील बियाण्यांचा प्रश्न यंदा मिटला आहे. पण हंगामातील लागणाऱ्या रासायनिक खताचे काय? तर यासाठी जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे.
रासायनिक खताचा पुरवठा व्यवस्थित व्हावा तसेच टंचाई निर्माण होऊ नये व साठे बाजारावर आता भरारी पथकाची नजर असणार आहे. त्यासाठी राज्यात तालुकानिहाय भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण होण्यामागील कारण म्हणजे रशिया-युक्रेन या दोन्ही देशात युद्ध जन्य परिस्थितीमुळे भारताला लागणाऱ्या खाताचा पुरवठा अद्यापही झालेला नाही.
भारतात रासायनिक खतासाठी लागणारा कच्चामाल हा रशियातून मागवला जातो. त्याची आयात या वर्षी झालेली नसल्यामुळे देशासमोर रासायनिक खताचे मोठे संकट उभे राहण्याची सध्या चिन्हे दिसत आहेत.
तर प्रशासनाकडून उपलब्ध रासायनिक खतांच्या साठ्याचे वितरण करण्यासाठी नियोजन केले जात आहे. त्यानुसार खरीपातील तूर, मूग, उडीद, कापूस सोयाबीन या पिकांसाठी लागणारे खताचे वितरण करण्यात येणार आहे.