शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा म्हणून नाफेडच्या माध्यमातून हमीभाव केंद्र उभारण्यात आली.तर सध्या हमीभाव केंद्रापेक्षा खुल्या बाजारातच तुरीला अधिकचा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी खुल्या बाजारातच तुरीची विक्री करत आहे.
हंगामाच्या सुरवातीला खरेदी केंद्रावर तुरीला अधिकचे दर होते. तर सध्याला हमीभाव केंद्रावर तुरीला 6 हजार 300 रुपये दर मिळत आहे. तर खुल्या बाजारात त्यापेक्षा अधिकचा दर तुरीला मिळत असल्याने हमीभाव केंद्रावरील चित्र बदलले आहे.
सुरुवातीला तुरीला हमीभाव केंद्रावर 6 हजार 300 असा दर होता.तर बाजारपेठेत 5 हजार 800 आसल्या ने त्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करून तुरीची विक्री केली. सध्याला मात्र खुल्या बाजारात तुरीचे भाव वाढले आहेत.
तर तुरीला खुल्या बाजारात 6 हजार 500 पर्यंत दर मिळत असल्याने नियम-अटींमध्ये गुंतून न राहता शेतकरी खुल्या बाजारात विक्री करुन अधिकचे पैसे कसे घेता येतील त्याकडे पहात आहे. एवढेच नाही तर तूर खरेदी केल्या नंतर हमीभाव केंद्रावर 8 दिवसांमध्य़े शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणे अपेक्षित आहे.
पण महिन्याभराच्या कालावधीनंतर पैसे जमा होत नाहीत. त्यामुळे बाजारपेठेतील रोकीच्या व्यवहाराकडे शेतकऱ्यांच्या कल दिसून येत आहे.