गेले काही दिवसांपासून उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून वाढत्या तापमानाचा परिणाम हा मुक्या जनावरांच्या जीवावर सुद्धा बेतू लागला आहे. बारामती तालुक्यात उष्मघातामुळे तीन शेळ्या एकाच दिवशी दगावल्या आहेत.
मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातही उन्हाची तीव्रता वाढली आहे.वाढत्या उन्हाचा परिणाम हा पिकांवर सुद्धा दिसून येत आहे. त्यामुळे पिकाच्या उत्पादनात देखील घट होणार आहे. मार्च महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढलेला आहे.
तर त्यामुळे बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील शेतकऱ्यांच्या तीन शेळ्या उष्माघाताने दगावल्या आहेत. तर शेळ्यांची उन्हाळ्यात काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी उन्हाळ्यात 11 ते 4 या काळात भरपूर ऊन असते. उन्हामुळे शेळ्यांमध्ये उष्माघाताचे प्रमाण वाढू शकते.
त्यामुळे चारून आल्यानंतर शेळ्यांना सावलीतच बांधणे गरजेचे आसते. शेळ्यांना उन्हात चरण्यासाठी विनाकारण जास्त अंतर चालवू नये. शक्यतो उन्हाळ्यात गोठ्यातच चारा देणे गरजेचे आहे. महत्वाचे शेळ्यांना थंड, स्वच्छ पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे. 24 तास गरजेनुसार पाणी पिण्यासाठी उपलब्ध होईल याची काळजी घेतली पाहिजे.