आधुनिक काळात दैनंदिन जीवनात आपण नानाविध विजेवर चालणाऱ्या वस्तूंचा वापर करीत असतो. आता तर वाहने देखील ई – बाईक स्वरुपात आली आहेत. साहजिकच बहुतांशी घरामध्ये प्रत्येक महिन्याकरीता लागणारे विजेचे युनिटची संख्या वाढत चालली आहे. पर्यायाने वीज बिलांमध्ये वाढ होत आहे. (Solar Rooftop In Maharashtra)
परंतु जिल्ह्यातील ७५ कुटुंबांनी घरात अत्याधुनिक विजेच्या उपकरणांचा वापर करुन देखील येणाऱ्या जादा रकमेच्या वीज बिलापासून स्वतःची सुटका करुन घेतली आहे. त्यांनी आपापल्या घरावर सोलर रुफ टॉप यंत्रणा बसविली आहे. साहजिकच त्यांना आता अवघे शंभर रुपये वीजबिल येत आहे. अजून काही दिवसांनी त्या बिलाची रक्कम देखील शून्यावर जाणार आहे.
हे पण वाचा : पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्याचा नादखुळा ! पाऊण एकरावर सुरु केली पपई शेती, दोन लाखांची कमाई करत बनला लखपती
दिवसेंदिवस महागाईचा आलेख वाढतच चालला आहे. विजेची दरवाढ संथ गतीने सुरु आहे. वाढीव खर्च कमी कसा करता येईल याचा विचार केला तरी त्यानुसार कृती करण्यास मात्र टाळाटाळ करण्याकडेच बहुतांशीजणांचा कल असतो. विदेशात सूर्यप्रकाशापासून वीज निर्मिती करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. परंतु अद्याप आपल्याकडे त्या प्रमाणात जागृती नाही हे नाकारुन चालणार नाही.
भविष्यात मात्र रुफ सोलर पॅनेलमध्ये वाढ होण्यासाठी महावितरण आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहेत. आत्तापर्यंत सोलर पॅनेलच्या माध्यमातून तयार होणारी वीज बॅटरीमध्ये साठवून त्याचा वापर घरातील विजेच्या उपकरणासाठी करण्यात येत होता. परंतु यामध्ये प्रत्येक महिन्याला करावी लागणारी बॅटरीची देखभाल तसेच सुमारे चार ते पाच वर्षानंतर बॅटरी खराब झाल्याने होणारा खर्च याचा आर्थिक ताळमेळ बसत नव्हता.
हे पण वाचा : सातबारा उतारा बनावट आहे की खरा ; ‘या’ पद्धतीने दोन मिनिटात ओळखा
यातील त्रुटी लक्षात घेता सोलर नेट मीटरची यंत्रणा अंमलात आणण्याचे धोरण महावितरणने ठरवून आता त्यानुसार कार्यवाही सुरु केली आहे. सांगली जिल्ह्याचा विचार केल्यास एकूण वीज ग्राहकांच्या तुलनेत याला मिळणारा कमी वाटला तरी हा बदल सकारात्मक आहे. सध्या जिल्ह्यातील ७५ घरगुती ग्राहकांनी सोलर रुफ टॉप यंत्रणा बसविली आहे. त्याची क्षमता २३९ किलोवॅट आहे. तर ४५३ किलोवॅट क्षमता असणाऱ्या १६२ ठिकाणी जानेवारीपर्यंत यंत्रणा कार्यान्वित होणार आहे.
🔸भारतीय बनवटीच्या पॅनेल लाच सबसिडी
एखाद्या घरासाठी महिन्यास २०० युनिट वीज लागत असेल तर त्या घराकरिता २ किलो वॅट क्षमतेची सोलर नेट मीटर यंत्रणा आवश्यक आहे. महिन्याला दोनशे युनिट वापर असेल तर महिन्याचे वीजबील किमान १५०० रुपये येते. सोलर रुफ टॉप यंत्रणेकरीता साधारणतः दीड लाख रुपये खर्च येतो. महावितरणने नेमलेल्या यंत्रणेमार्फत जर घरावर सोलर पॅनेल बसविले तर पॅनेलच्या रकमेवर चाळीस टक्के सबसिडी मिळते. जर महावितरणने नेमलेल्या यंत्रणेव्यतिरिक्त अन्य परदेशी कंपनीचे सोलर पॅनेल बसविले तर सबसिडी मिळत नाही.
हे पण वाचा : लोणचे उत्पादकांकडून लिंबाची खरेदी, पण दर दबावातच ; शेतकऱ्यांची चिंता कायम
🔸जागृतीमुळे सोलर यंत्रणेला पसंती
सोलर रुफ यंत्रणेची किंमत आणि मिळणारे शासकीय अनुदान आणि भविष्यात होणारी बचत विचारात घेता अधिकाधिक नागरिकांनी आपआपल्या घरावर सोलर यंत्रणेचा पर्याय स्वीकारण्यास प्रारंभ केला आहे. अर्थात यामध्ये महावितरणच्या माध्यमातून होणाऱ्या जागृतीचा देखील महत्वाचा वाटा आहे. आर्थिक दृष्टीकोनातून विचार केल्यास साधारणतः तीन ते चार वर्षात आपण केलेली गुंतवणूक आपल्याला परत मिळते.
– संदीप गायकवाड संचालक, सन अर्थ सोलर एनर्जी सिस्टिम
🔸सोलर नेट मीटर म्हणजे काय ?
अद्यापही कित्येकजण सोलर रुफ टॉप यंत्रणेबाबत अनभिज्ञ आहेत. घरावर सोलर पॅनेल बसविल्यावर तयार होणारी वीज सोलर इनर्व्हरटरच्या माध्यमातून
दिवसा घरासाठी वापरली जाते. जादाची तयार होणारी वीज ही महावितरणच्या नेट मीटरच्या माध्यमातून ट्रान्सफॉरमरला दिली जाते. पुन्हा रात्रीच्या वेळी आपल्याकडून घेतलेली वीज महावितरण रात्रीच्या वापराकरीता आपल्याला परत देते. समजा सूर्यप्रकाशापासून आपण महिन्याला अधिक वीज तयार केली तर
ती वीज महावितरणकडे सुरक्षित ठेवली जाते. ज्यावेळी सोलरच्या माध्यमातून वीज निर्मिती कमी असेल तेव्हा ती जमा वीज आपल्याला पुरविली जाते. या
प्रक्रियेमध्ये एक्सपोर्ट आणि इंपोर्ट वीज या दोन्हीच्या स्वतंत्र युनिटची संख्या नेट मीटरमध्ये आपल्याला पहावयास मिळते. महिन्याच्या अखेरीस दोन्हीची वजावट
करुन महावितरण आपल्याला वीज पाठविते.
हे पण वाचा : आता बांबू लागवडीसाठी मिळणार प्रति रोप 120 रुपयांच अनुदान